Accident News : जालंधर येथील अपघातात चिखलदरा तालुक्यातील चौघांचा मृत्यू

दोघे गंभीर जखमी, सोलामहू गावात पसरली शोककळा
Accident News
Accident Newssakal

चिखलदरा/जामली : सैन्यदलात कार्यरत मुलाला पंजाब राज्यातील जालंधर येथे सोडून वैष्णवदेवीचे दर्शन करून परत येत असताना जालंधर, पंजाब येथील एका मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मेळघाटातील सोलामहू गावात शोककळा पसरली आहे.

Accident News
Nashik News : कडक उन्हामुळे दुपारी सिग्नल बंद; सायंकाळी सुरू करण्याचा विसर

चिखलदरा तालुक्यातील सोलामहू येथे गानूजी बेलसरे यांचा मोठा मुलगा लोकेश बेलसरे सहायक शिक्षक तर लहान मुलगा मंगेश बेलसरे हा बीएसएफ जालंधरमध्ये कार्यरत आहे. नातेवाइकांकडे लग्न असल्याने तो १५ दिवसांच्या रजेवर आला होता. बेलसरे कुटुंब वैष्णोदेवी दर्शन व मुलाला कर्तव्यावर हजर होण्यासाठी ३० एप्रिलला सोलामहू येथून स्वत:च्या खासगी वाहनाने निघाले होते. मंगेश पत्नीसह कर्तव्यावर हजर राहण्यासाठी जालंधरला अगोदर आला व बाकी परिवाराला नंतर येण्यासाठी सांगितले.

Accident News
IPO News Update : आधार हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित ; ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची घोडदौड

गानू बेलसरे (वय ५८), लोकेश बेलसरे (वय ४५), अनिषा लोकेश बेलसरे (वय ४०), नेहरिका (वय ११ महिने), श्रीराम कासदेकर (वय ४०), सरस्वती कासदेकर (वय ३८) हे वैष्णोदेवीवरून परत जालंधर येथे येत असताना हायवेवर मागून एका ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे या गाडीचा चुराडा झाला. या अपघातात गानू बेलसरे (वय ५८), लोकेश गानू बेलसरे (वय ४५), अनिषा लोकेश बेलसरे (वय ४०), नेहारिका लोकेश बेलसरे (वय ११ महिने, सर्व रा. सोलामहू) यांचा मृत्यू झाला. तर श्रीराम कासदेकर (वय ४०), सरस्वती श्रीराम कासदेकर (वय ३८, दोन्ही रा. नयाखेडा जांभडा, ता. अचलपूर), हे दोघे गंभीर जखमी असून जालंधर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती गावात येताच संपूर्ण मेळघाटात शोककळा पसरली आहे.

जालंधर पंजाब येथे बीएसएफमध्ये कार्यरत असलेल्या मंगेश बेलसरे यांनी मला फोनवर घटनेची हकीकत सांगितली. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. लवकरच जालंधर पंजाब येथून सोलामहू येथील राहत्या घरी मृतदेह आणण्यात येईल.

-केवलराम काळे, मेळघाटचे माजी आमदार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com