हृदयद्रावक... आजोबा, नातूसह दोन महिलांचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

सध्या शेतात निंदण आणि डवरणाचे काम सुरू आहे. याच कामासाठी मजूर म्हणून गेलेल्या या महिला शेतकऱ्याच्या बैलबंडीने परत येत होते. दरम्यान, झालेल्या पावसामुळे आष्टा येथील नाल्याला पूर आला. या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी या पाण्यात टाकली. बैलबंडी नाल्यात फसली. यात बैलबडीरील दोन्ही महिला पाण्यात पडून वाहून गेल्याचे गावक्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

वर्धा : नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, एक बारा वर्षीय मुलगा आणि एक पुरुष वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एक घटना सोनेगाव (आष्टा) येथे शुक्रवारी रात्री उघडकीस आली. दुसरी घटना गोजी येथे शनिवारी सकाळी घडकीस आली. चारही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

चंद्रकला लोटे रा. सोनेगाव (स्टेशन) आणि बेबी भोयर रा. तळेगाव (टालाटुले) असे वाहून गेलेल्या दोन महिलांची नावे आहेत. गोजी येथे सापडलेल्यात नारायण पोहणे आणि त्यांचा नातू मंगेश रामचंद्र हिवरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चारही मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

जाणून घ्या - मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे? 

सध्या शेतात निंदण आणि डवरणाचे काम सुरू आहे. याच कामासाठी मजूर म्हणून गेलेल्या या महिला शेतकऱ्याच्या बैलबंडीने परत येत होते. दरम्यान, झालेल्या पावसामुळे आष्टा येथील नाल्याला पूर आला. या पुराच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी या पाण्यात टाकली. बैलबंडी नाल्यात फसली. यात बैलबडीरील दोन्ही महिला पाण्यात पडून वाहून गेल्याचे गावक्‍यांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांच्याकडून मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला. यात रात्री उशिरा दोन्ही महिलांचे मृतदेह मिळून आले. 

आजोबा नातू गेले वाहून

धोत्रा (कासार) येथील आजोबा आणि नातू हे दोघे बैलबंडीने सावली सास्ताबाद येथे जात होते. दरम्यान गोजी लगत असलेल्या एका नाल्याला पूर होता. या पुरचा अंदाज आला नसताना या दोघांनी बैलबंडी त्यात टाकली. यात त्यांची बैलबंडी वाहून गेली. यात त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह गोजी येथील नाल्यात आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four person died after being swept away by water at Wardha