Video : विश्‍वास बसेल का? चौदा फूट उंच झाड तेही मिरचीच...

नीलेश झाडे
Sunday, 26 April 2020

प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार मिरचीचा वापर करीत असतात. कुणाला तिखट खायला आवडते तर कुणाला फिके... असे असले तरी तिखट टाकले जातेच... मिरचीला हात लावून धुतले नाही आणि डोळ्यांना लावले तरी आग होते. इतक्‍या त्या तिखट असतात. 

धाबा (जि. चंद्रपूर) : मिरचीचे नाव उच्चारले की तोंडाला नाही मात्र डोळ्यात पाणी आपसूकच येते. मिरची तिखट असली तरी स्वयंपाक घरात ही अविभाज्य घटक आहे. मिरचीचे झाड प्रत्येकानीच बघितले आहेत. मिरचीच्या झाडाची उंची चार ते पाच फुटांची असते. कुणी म्हटल मिरचीचे झाड चौदा फूट उंचीचे आहे तर? सांगणाऱ्याला तुम्ही वेडात काढाल. काहीही सांगता का राव... असच काहीस तुमच उत्तर असले. मात्र, हे खरं आहे... 

मिरचीचे दोन प्रकार आहेत. एक लाल तर दुसरी हिरवी. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मिरची असतेच. कारण, मिरची शिवाय खाद्य पूर्ण होत नाही. भाजी करायची टाक मिरची, नाश्‍ता करायचा टाक मिरची... असं सर्वच प्रकारच्या भाज्यांमध्ये मिरची टाकली जाते. तसेच मिरचीचे पावडरही वापरले जाते. मिरचीशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही.

अधिक माहितीसाठी - प्रेयसीशी केले घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; फक्‍त तीन महिन्यांसाठी घर घ्यायचा किरायाने, एकेदिवशी...

बाजारात गेल्यानंतर महिला मिरचीची आठवनीने खरेदी करीत असतात. मिरची तिखट असली तरी तिचा मोठ्या प्रमाणात वाटपर केला जातो. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार मिरचीचा वापर करीत असतात. कुणाला तिखट खायला आवडते तर कुणाला फिके... असे असले तरी तिखट टाकले जातेच... मिरचीला हात लावून धुतले नाही आणि डोळ्यांना लावले तरी आग होते. इतक्‍या त्या तिखट असतात. 

मात्र, मिरचीचे झाड कसे असते किंवा किती मोठे असते असा प्रश्‍न तुमच्यापैकी कुणाला पडला असलेच. मिरचीच्या झाडाची उंची किती फूट असू शकते? फार फार तर चार ते पाच फूट... मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथे तब्बल चौदा फूट उंच असलेले मिरचीचे झाड आहे. विशेष म्हणजे बुंध्यापासून ते थेट शेवटचा टोकापर्यंत झाडाला मिरच्याच मिरच्या लागलेल्या आहेत. यामुळे हे झाड परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

बुंध्यापासून शेवटचा टोकापर्यंत मिरचीच मिरची

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्‍यातील धाबा येथे तब्बल चौदा फूट उंच असलेले मिरचीचे झाड आहे. धाबा येथील शेख रमजान शेख नासर यांच्या परसबागेत चौदा फुटाचं मिरचीच झाड डौलात उभे आहे. विशेष बाब म्हणजे मिरचीच्या झाडाचा बुंध्यापासून ते थेट शेवटचा टोकापर्यंत मिरचीच मिरची लागलेल्या आहेत. यामुळे मिरचीचे हे झाड कुतूहलाचा विषय ठरलं आहे.

जाणून घ्या - आम्हा पती-पत्नीचा घटस्फोट; आईने दुसरे लग्न केल्याने झाले असावे असे!

नागरिकांना पडला प्रश्‍न

परसबागेतील सर्व झाडांना सारखेच खत पाणी दिल्याने शेख रमजान शेख यांनी सांगितले. तरीही या झाडाची उच्ची चौदा फुटापर्यंत गेली. विशेष म्हणजे झाडाला चांगल्या मिरच्या लागलेल्या आहेत. मिरचीचे झाड इतक मोठे कसे होऊ शकते हा सध्या संशोधनाचा विषय झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen feet tall chilly tree in Chandrapur district