चतुर्थश्रेणी कर्मचारी काढतो एक्‍स रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात (वॉर्ड क्रमांक 24) गंभीर रुग्ण भरती असतात. यामुळेच अतिदक्षता विभागात मोबाईल "एक्‍स रे' लावण्यात आले. मात्र एक्‍स रे संदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या आउटसोर्स कर्मचारी मेडिकलमध्ये रुग्णांचे "एक्‍स रे' काढत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मेडिकलच्या अतिदक्षता वॉर्डात एक चिमुकली भरती आहे. येथे चिमुकलीचा एक्‍स रे काढण्यात आउटसोर्स केलेला एका खासगी कंपनीचा कर्मचारी एक्‍स रे काढत होता. विशेष असे की, किती फॅक्‍टरवर नोंद करतात, याचे ज्ञान या कर्मचाऱ्याला नाही. टीएलडी बॅच लावला नाही. यामुळे अतिदक्षता विभागात भरती रुग्ण मुलीच्या नातेवाइकांसह साऱ्यांना किरणोत्सर्गाच्या (रेडिएशन) संपर्कात आल्याने धोका असतो. किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्याने कॅन्सर तसेच क्षयरोगासारखे गंभीर आजार होण्याची भीती आहे. येथे डॉक्‍टर, परिचारिका सारे उपस्थित असताना आउटसोर्स कर्मचाऱ्याच्या हाती प्रशासनाने "एक्‍स रे' यंत्र दिले. त्याला एक्‍स रे काढता येत नसल्याने एक्‍स रे यंत्रावर तो बोटं नाचवित होता, अशी तक्रार एका रुग्णाच्या नातेवाइकाने केली. विशेष असे की, एक्‍स रे काढताना "लिड गाऊन' परिधान करणे आवश्‍यक असते, परंतु या कर्मचाऱ्याने लिड गाऊन घातला नव्हता. त्याच्याही जिवाला धोका होता. हा खेळ आणखी किती दिवस मेडिकलमध्ये सुरू असणार असा सवाल पुढे आला आहे. सिव्हिल ह्युमन राइट प्रोटेक्‍शन असोसिएशनतर्फे या प्रकरणाची तक्रार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात येईल, असे कळविण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourth grade employee removes x-ray