esakal | मेळघाटातील अनेक डॉक्टरांनी ठेवले ‘विश्वास’ नाव; वाचा कारण
sakal

बोलून बातमी शोधा

मेळघाटातील अनेक डॉक्टरांनी ठेवले ‘विश्वास’ नाव; वाचा कारण

मेळघाटातील अनेक डॉक्टरांनी ठेवले ‘विश्वास’ नाव; वाचा कारण

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : तालुक्यासह मेळघाटातील (Melghat) बहुतेक गावांमध्ये आरोग्य विभाग पोहोचत नसल्याचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टरांचा शिरकाव (Infiltration of duplicate doctor) झाला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधून आलेल्या डॉक्टरांची संख्या अधिक (The number of doctors in West Bengal is higher) आहे. परिणामी मेळघाटातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विश्वास बसावा म्हणून या बंगाली डॉक्टरांनी आपले नावसुद्धा विश्वास ठेवून घेतले. यातील अनेक डॉक्टर कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. (Fraud-doctors-grew-up-in-Melghat-in-Amravati-district)

अमरावती जिल्ह्यातील एकट्या अचलपूर तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. तर मेळघाटातही बोगस डॉक्टरांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधून आलेल्या बोगस डॉक्टरांची संख्या अधिक आहे. त्यांच्यावर अनेकदा राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई झाली नाही. काहीवेळा कारवाईची माहिती मिळताच हे बोगस डॉक्टर दवाखाना बंद करून पळ काढतात.

हेही वाचा: प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस

सध्या कोरोना काळात ताप, सर्दी, खोकला असलेल्या कोरोना संशयित रुग्णांवर पॅरेसिटेमॉल सारख्या गोळ्या देऊन हे डॉक्टर बिनधास्तपणे उपचार करीत असल्याचे नागरिक सांगतात. याबाबत अनेकदा ‘सकाळ’ने बोगस डॉक्टरांचे कारनामे समोर आणलेत. काही वेळा आरोग्य विभागाने बातमीची दखल घेत कारवाईसुद्धा केली. मात्र, गावातील काही राजकीय लोकांच्या मदतीने अशा बोगस डॉक्टरांना पाठीशी घातले गेले.

ग्रामीण भागात जसा कोरोना वाढू लागला तसा या लोकांचा गल्लासुद्धा वाढत आहे. कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक शासकीय किंवा चांगल्या दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतात आणि याचाच फायदा घेत हे बोगस डॉक्टर कोरोना संशयितांवरसुद्धा उपचार करीत आहेत. याकडे आरोग्य विभागातील काही अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.

सरपंच, सचिवांवर द्यावी जबाबदारी

प्रत्येक गावात सरपंच, सचिव आहेत. त्यांचे गावातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष असते. त्यामुळे गावात कोण डॉक्टर आहेत व त्यांची डिग्री काय, याची तपासणी केली जाईल. गावातील सरपंच तथा सचिव यांच्यावर जबाबदारी दिल्यास कोणीही बोगस डॉक्टर दवाखाना सुरू करणार नाही आणि एवढे करूनही जर कोणत्या बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले तर सरपंच, सचिवांची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी जेणे करून बोगस डॉक्टरांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल, असे मत सुज्ञ नागरिकांचे आहे.

हेही वाचा: जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

बोगस डॉक्टरांच्या संबंधित तालुका तसेच ग्रामस्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्याकडे तक्रार केल्यास अवश्य कायदेशीर कारवाई करण्यात येते. मात्र, त्यासाठी नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून प्रशासनाला कळवावे, जेणेकरून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास मदत होईल. सोबतच ग्रामपंचायत सचिवांकडूनसुद्धा वेळोवेळी बोगस डॉक्टरांची माहिती मागण्यात येईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

(Fraud-doctors-grew-up-in-Melghat-in-Amravati-district)

loading image