esakal | प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस

प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : दोन लग्न झाल्यानंतरही तिसऱ्या प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या महिलेने एका १७ वर्षीय मुलीच्या अपहरणाचे नाट्य (Drama of abduction of a girl) रचले. ज्या मुलीला सोबत नेले तिच्यावरही अत्याचार झाला. अनैतिक संबंधासाठी सुरू असलेला हा सर्व प्रकार विवाहित महिलेच्या सावत्र मुलामुळेच उघड झाला. याप्रकरणी महिलेला अटक झाली असून, १६ वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलालाही ताब्यात घेतले आहे. (Abduction drama staged for boyfriend's visit)

पिंकी (२८) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिला ऐशोआरामात राहण्याची सवय होती. त्यामुळे तिने पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या युवकासोबत लग्न केले. दुसऱ्या पतीपासून तिला तीन वर्षांची मुलगी आहे. पती असूनही पिंकीचे छिंदवाडा येथील तरुणासोबत सूत जुळले. पिंकीला भेटण्यासाठी तो छिंदवाड्यातून नागपुरात येत असे. दरम्यान, प्रियकराने पिंकीला छिंदवाड्याला येण्यास सांगितले. ती एकटी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने शक्कल लढविली.

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणासंदर्भात चिमुकलीने मुख्याध्यापकांना लिहिले पत्र; सर...

घराशेजारी राहणारी १७ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही पिंकीच्या ओळखीची होती. त्यामुळे तिने मुलीला सोबत नेण्याचे ठरविले. २४ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिंकी मुलीच्या घरी आली. लग्न असल्यामुळे कुटुंबीयांसोबत छिंदवाड्याला जात असून रियाला सोबत पाठविण्याची विनंती पिंकीने रियाच्या आईला केली. पिंकी ओळखीची असल्याने तिला जाऊ दिले. पिंकी आणि रिया या दोघीच थेट छिंदवाड्याला गेल्या.

मुलाच्या प्रश्‍नाने केला घोळ

२६ मे रोजी पिंकीचा सावत्र मुलगा मुलीच्या घरी आला आणि ‘माझी आई आली होती का?’ अशी विचारणा केली. पिंकीने तर कुटुंबीयांसोबत लग्नाला जात असल्याचे सांगितले. तिने पिंकीच्या पतीला फोन केला. तो नागपुरातच होता. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

हेही वाचा: नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

रियावर झाला बलात्कार

रिया पिंकीला घेऊन छिंदवाडा येथे गेल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून पोलिस पथक छिंदवाड्याला गेले. पोलिसांनी पिंकी आणि रियाला ताब्यात घेतले. पोलिसांनी रियाची विचारपूस केली. तेथे १६ वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यावरून मुलाला देखील ताब्यात घेतले. सर्वांना नागपूरला आणून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून पिंकीला अटक केली.

(Abduction drama staged for boyfriend's visit)

loading image
go to top