वीरपत्नीस एसटी बसमधून मोफत प्रवास

चेतन देशमुख
बुधवार, 25 एप्रिल 2018

यवतमाळ - कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या भारतीय सैन्यातील जवान तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नीला एसटी महामंडळाच्या सर्वच बसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे. १ मे, महाराष्ट्र दिनापासून ही योजना राज्यात लागू होणार आहे.

देशसेवा करण्यासाठी कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नीला आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना’ राबविणार आहे. या योजनेअंतर्गत सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नीला महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास योजना सवलत लागू करण्यात आली आहे. १ मे या महाराष्ट्रदिनापासून राज्यभर योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे. 

अधिकारी, पर्यवेक्षकावर जबाबदारी
आपल्या विभागात येणाऱ्या जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून शहीद जवान व त्यांच्या वीरपत्नीचे छायाचित्र प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांच्या पत्त्यावर भेट देऊन ही कार्यवाही राज्य परिवहन विभागातील अधिकारी, पर्यवेक्षकांना करावी लागणार आहे.

Web Title: Free travel by martyr soldiers wife ST buses