शहर बसमधून वीरपत्नींना मोफत प्रवास? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - महापालिकेच्या परिवहन समितीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे गुरुवारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाबाबत उत्सुकता कायम असून अनेक नव्या योजनांचा समावेश असल्याचे समजते. यात शहर बसमधून वीरपत्नींना मोफत प्रवासाच्या योजनेचाही समावेश करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

मागील वर्षी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी 256 कोटींचे अंदाजपत्रक दिले होते. मात्र, मागील वर्षी परिवहन विभागाला 60 कोटींचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे कुकडे यावर्षी किती कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सोपवितात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. जवळपास अडीचशे कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रवाशांच्या सेवेसाठी बस चालवित असल्याने लाभावर भर न देता नव्या योजनांतून प्रवाशांना सहज व सुखकर प्रवासावर देणारे अंदाजपत्रक सादर करण्याचा बंटी कुकडे यांचा प्रयत्न राहणार आहे. यात 70 इलेक्‍ट्रिक बस तसेच 25 बायोगॅसवरील बसचा ताफा शहर प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. मागील वर्षी कुकडे यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलतीची योजना राबविली. यंदाही अशाच प्रकारच्या नव्या योजना देण्याची शक्‍यता आहे. यात प्रामुख्याने युद्धात वीरमरण पत्करणारे हुतात्मे, नक्षल्याशी लढताना जीव देणाऱ्या पोलिसांच्या विधवांना मोफत प्रवासासारखी योजनेचा समावेश राहण्याची शक्‍यता आहे. 

अडीचशे कोटींपर्यंत अंदाजपत्रक 
मागील वर्षी विभागाला आलेली तूट लक्षात घेता यंदा अडीचशे कोटींपर्यंत परिवहन समितीचा अर्थसंकल्प राहणार असल्याचे सूत्राने नमूद केले. येत्या 24 रोजी हा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा यांना देण्यात येईल. 

Web Title: Free travel to the soldier wife from a city bus