
भूषणचे नृत्य बघून रसिकांच्या तोंडातून कौतुकाचे स्वर बाहेर पडायचे. ऐन उमेदीच्या काळात त्याला दुर्धर आजाराने पछाडले. कमरेखाली चेतना असली; तरी चालता येत नाही. हा त्रास आणखीच वाढत चालला आहे. आजवर नातेवाईक, मित्रमंडळी यांनी आपापल्या परीने मदत केली. आईवडिलांनी पैसा जोडून दोन लाखांपर्यंतचा खर्च केला.
यवतमाळ : दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भूषण क्षीरसागर या तरुणाला उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च येणार आहे. भूषण हा डान्सर असल्याने मित्रांचा प्रिय आहे. मंत्री व शासन यांच्याकडे याचना करूनही त्याला मदत मिळाली नाही. त्यामुळे आपला मित्र पुन्हा पायावर उभा व्हावा, त्याच्या आयुष्यात नंदनवन फुलावे, यासाठी मित्र कार्यालय व बॅंकेत जाऊन पैसा गोळा करीत आहेत. मित्राच्या मदतीसाठी मित्रच धावल्याने कौतुक केले जात आहे.
यवतमाळ शहरातील अंबिकानगरात वास्तव्यास असलेल्या तरुणाचे वय अवघे २२ वर्षे आहे. उपचारासाठी डॉक्टरांनी सहा लाखांचा खर्च सांगितला. वडील सुतार काम करीत कुटुंबाचा गाडा ओढतात. इतकी मोठी रक्कम आणायची कुठून, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. एकेकाळी त्याचे पाय रंगमंचावर थिरकायचे. डान्स क्लासेसच्या माध्यमातून त्याने कित्येक कलाकार घडविले आहेत. नृत्य स्पर्धेत भूषणने पारितोषिकावर आपल्या नावाची मोहोर उमटविली आहे. काही वर्षांपूर्वी त्याला आजाराने पछाडले व नृत्यासह बीएचे शिक्षणही अर्ध्यांवरच सोडावे लागले.
जाणून घ्या : यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ४६ शुभ मुहूर्त; तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार
भूषणचे नृत्य बघून रसिकांच्या तोंडातून कौतुकाचे स्वर बाहेर पडायचे. ऐन उमेदीच्या काळात त्याला दुर्धर आजाराने पछाडले. कमरेखाली चेतना असली; तरी चालता येत नाही. हा त्रास आणखीच वाढत चालला आहे. आजवर नातेवाईक, मित्रमंडळी यांनी आपापल्या परीने मदत केली. आईवडिलांनी पैसा जोडून दोन लाखांपर्यंतचा खर्च केला. शासनस्तरावर कोणतीही मदत मिळू शकली नाही. त्याच्यावर दिल्ली येथेच उपचार होऊ शकतात. मात्र, सहा लाखांची रक्कम जमा करणे सुतारकाम करणाऱ्या वडिलांना अवघड जात आहे.
परिणामी उपचाराअभावी दीड वर्षापासून तो घरातच आहे. आपला मित्र आजारातून बरा व्हावा, यासाठी मित्र परिवार शासकीय कार्यालय, बॅंकेत जाऊन मदत गोळा करीत आहेत. त्यात हर्षल चव्हाण, गौरव पाढेण, रूपेश वासनिक, प्रशांत चौधरी, प्रणय मून, प्रतीक घरत, अभिषेक पांडे, अल्केश अंभोरे, विवेक काळे, अमित लभाणे, ऋतिक पाटील, अभय डोंगरे यांचा समावेश आहे. जीवनात मित्र किती आवश्यक आहेत, हेदेखील त्यातून अधोरेखित होते.
अवश्य वाचा : सहा एकर शेतातून निघाला फक्त १० किलो कापूस; संतापून शेतकऱ्याने कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर
नृत्यात निपुण असल्याने अगदी कमी वयात ‘डान्सर' हिरो ही ओळख भूषणला मिळाली. आयुष्याची सोनेरी स्वप्न बघत असतानाच काही वर्षांपूर्वी ‘एव्हीएन' या दुर्धर आजाराने त्याला ग्रासले. रंगमंचावर थिरकणाऱ्या पायाला आता कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)