esakal | ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

Friends raised six lakh for the treatment in Yavatmal District

काही वर्षांपूर्वी आजाराने पछाडले व नृत्यासह बीएचे शिक्षणही अर्ध्यावरच सोडावे लागले. भूषणचे नृत्य बघून रसिकांच्या तोंडातून कौतुकाचे स्वर बाहेर पडायचे. ऐन उमेदीच्या काळात त्याला दुर्धर आजाराने पछाडले. कमरेखाली चेतना असली तरी चालता येत नाही. हा त्रास आणखीच वाढत चालला आहे.

ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : संकटसमयी धावून येतात तेच खरे मित्र. आयुष्यात मित्रांचा गोतावळा जवळ असला की, नंदनवन फुलते. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भूषण क्षीरसागर या तरुणाच्या उपचारासाठी मित्रांनीच पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर शासकीय कार्यालय व बॅंकेत जाऊन तब्बल पाच लाख ४० हजार रुपयांची मदत गोळा केली. तरीदेखील अजून ६० हजार रुपये हवे आहेत. ती रक्कम गोळा झाल्यास भूषणवर लवकरच दिल्ली येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

भूषणचे वय अवघे २२ वर्षे आहे. उपचारासाठी डॉक्‍टरांनी सहा लाखांचा खर्च सांगितला. वडील सुतार काम करीत कुटुंबाचा गाडा ओढतात. इतकी मोठी रक्कम आणायची कुठून, हा प्रश्‍न कुटुंबीयांना पडला आहे. डान्स क्‍लासेसच्या माध्यमातून त्याने कित्येक कलाकार घडविले आहेत. नृत्य स्पर्धेत भूषणने पारितोषिकावर आपल्या नावाची मोहोर उमटविली आहे.

हेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश

काही वर्षांपूर्वी आजाराने पछाडले व नृत्यासह बीएचे शिक्षणही अर्ध्यावरच सोडावे लागले. भूषणचे नृत्य बघून रसिकांच्या तोंडातून कौतुकाचे स्वर बाहेर पडायचे. ऐन उमेदीच्या काळात त्याला दुर्धर आजाराने पछाडले. कमरेखाली चेतना असली तरी चालता येत नाही. हा त्रास आणखीच वाढत चालला आहे. आजवर नातेवाईक, मित्रमंडळी यांनी आपापल्या परीने मदत केली.

आई-वडिलांनी पैसा जोडून दोन लाखांपर्यंतचा खर्च केला. शासनस्तरावर कोणतीही मदत मिळू शकली नाही. उपचाराअभावी दीड वर्षांपासून तो घरातच आहे. आपला मित्र आजारातून बरा व्हावा, यासाठी मित्र परिवार शासकीय कार्यालय, बॅंकेत जाऊन पाच लाख ४० हजार रुपयांची मदत गोळा केली. अजूनही मदतीसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहे.

जाणून घ्या - हृदयद्रावक! लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

२६ नोव्हेंबर ही ऑपरेशनची तारीख
दोन महिन्यांपूर्वी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली. सहा लाखांपैकी पाच लाख ४० हजार रुपये गोळा झाले. २६ नोव्हेंबर ही ऑपरेशनची तारीख दिल्ली येथील डॉक्‍टरांनी भूषणला दिली आहे. त्यामुळे उरलेले ६० हजार रुपये लवकरात लवकर गोळा करायचे आहेत. दहा गुन्हे करणाऱ्या हातांपेक्षा एक मदत करणारा हात केव्हाही श्रेष्ठ असतो.
- हर्षल चव्हाण,
भूषण क्षीरसागरचा मित्र

संपादन - नीलेश डाखोरे

loading image