कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भरला दम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नागपूर - कॉंग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करू शकत नाही, असे बोलले जाते. आज मात्र पोलिसांना गुंगारा देत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रिझर्व्ह बॅंकेच्या प्रवेशद्वारावर आक्रमण केल्याने सारेच अवाक्‌ झाले. काहीवेळ पोलिसांनाही काही कळले नाही. 

नागपूर - कॉंग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करू शकत नाही, असे बोलले जाते. आज मात्र पोलिसांना गुंगारा देत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रिझर्व्ह बॅंकेच्या प्रवेशद्वारावर आक्रमण केल्याने सारेच अवाक्‌ झाले. काहीवेळ पोलिसांनाही काही कळले नाही. 

नोटाबंदीच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शांततेत पार पडेल, असे वाटत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. इरशाद अली, बंटी शेळके, आमिर लोही, विवेक निकोसे यांच्यासह युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून रिझर्व्ह बॅंकेच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहोचले. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश द्वारावर चढून घोषणा देण्यास सुरुवात केली. पोलिसही काहीही करू शकले नाही. "ऊर्जित पटेल हाय हाय', "नरेंद्र मोदी मुर्दाबाद'च्या घोषणा सुरू झाल्या. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून रिझर्व्ह बॅंकेचे कर्मचारीही बाहेर आले. 

या आंदोलनात युवक कॉंग्रेसच्या जुन्या दिवसांची अनेक नेत्यांनी आठवण करून दिली. परंतु, गेल्या काही वर्षात सतत सत्तेत राहिल्याने आंदोलनाची सवय राहिली नाही, असा आरोप केला जात होता. आजच्या आंदोलनाने युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप खोडून काढला. बंटी शेळके यांच्या नेतृत्वात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला वेगळे स्वरूप दिले. यात एनएसयूआयचे काही युवतीही सामील झाले होते. लाठीमार झाल्यानंतर युवक कार्यकर्ते पांगल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनीही रिझर्व्ह बॅंकेसमोर घोषणा देण्यास सुरुवात केली. महिलांनी रस्त्यावरच बसून घोषणा देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनाही बळाचा वापर करता आला नाही. 

या आंदोलनात बाबूराव तिडके, नगरसेवक प्रशांत धवड, दीपक वानखेडे, प्रसन्न तिडके, यशवंत कुंभलकर, किशोर जिचकार, तानाजी वनवे, झुल्फीकार अली भुट्टो, बाबा डवरे, यशवंत मेश्राम, हुकूमचंद आमधरे, दीपक कापसे, नाना गावंडे, प्रज्ञा बडवाईक, रेखा बारहाते, विजय बाभरे, अनिल पांडे, अतुल कोटेचा, अभिजित सपकाळ, रामगोविंद खोब्रागडे, सीमा येरपुडे, राजेंद्र काळमेघ, महादेव नगराळे सहभागी झाले होते. 

राऊत गट दूरच 
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या गटातील कार्यकर्ते मात्र आजच्या आंदोलनापासून दूर राहिले. डॉ. राऊत गावात नाहीत. परंतु, त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले नाही. कुणाल राऊत, दीक्षा राऊत हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी या आंदोलनात न येणेच पसंद केले. 

सतीश चतुर्वेदी आले 
अंतर्गत वादामुळे कॉंग्रेसच्या कार्यक्रमांपासून दूर राहणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आंदोलनात सहभागी झाले. त्यांचे समर्थकसुद्धा आले होते. विशेष म्हणजे विलास मुत्तेमवार यांच्याशी झालेल्या वादामुळे चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत यांनी कॉंग्रेसच्या स्थापनादिन कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

Web Title: Full intimidate Congress workers