गावांच्या विकासाची कासव गती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

चाैदाव्या वित्त आयाेगांतर्गत ग्रामपंचायतींनी करायची कामे
- पाणीपुरवठ्याच्या स्त्राेतांचा विकास करणे, ‘आरआे’ पाणी प्रणाली बसविणे व त्याच्या देखभालीकरीता व्यवस्था करणे. 
- स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन करणे. उत्पन्न वाढीसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणे. पेव्हर ब्लाॅक बसविणे, डास मुक्त गावासाठी प्रयत्न करणे. 
- ग्रामपंचायत भवन नसेल अशा ठिकाणी भवन बांधणे किंवा भवनाचा विस्तार करणे. फर्निचर खरेदी करणे. अंगणवाडीसाठी इमारत बांधणे. 
- सार्वजनिक रस्त्यावर दिवे लावण्याची व्यवस्था करणे व दिव्यांची देखभाल दुरूस्ती करणे.

अकाेला : केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील ५३३ ग्रामपंचायतींना आतापर्यंत काेट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात विकास कामे करण्यासाठी देण्यात आलेला हा ग्रामपंचायतींकडे पडून असल्यामुळे ग्रामविकास खुंटला आहे. 

चाैदाव्या केंद्रीय वित्त आयाेगाच्या शिफारशीनुसार ता.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला ‘बेसिक ग्रॅंट’ व ‘परफॉर्मन्स ग्रॅंट’ या दाेन प्रकारच्या ग्रॅट्सच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गावपातळीवर नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी हा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निधीमधून ‘आमचं गाव, आमचा विकास’ या याेजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनामार्फत ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत, परंतु असे असल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायती चाैदाव्या वित्त आयाेगाचा निधी खर्च करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे काेट्यावधी रूपये विकास कामांवर खर्च करण्यासाठी उपलब्ध असल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतींचा विकास कागदावरच आहे.

काेट्यावधींचा निधी पडून
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०१५ पासून आतापर्यंत काेट्यावधी रूपये देण्यात आले. तर २०१७-१८ मध्ये ४५ काेटी ५८ लाख १४ हजार ९२२ रूपये व २०१६-१७ मध्ये सुद्धा काेट्यावधीचा निधी देण्यात आला. परंतु हा निधी ग्रामपंचायती कासव गतीने करत आहेत. त्यामुळे गावांत करण्यात येणारी विकास कामे सुद्धा कासव गतीने सुरू आहेत. परिणामी ‘आपलं गाव, आपचा विकास’ याेजना सुद्धा प्रभावित हाेत असल्याचे दिसून येत आहे.

चाैदाव्या वित्त आयाेगांतर्गत ग्रामपंचायतींनी करायची कामे
- पाणीपुरवठ्याच्या स्त्राेतांचा विकास करणे, ‘आरआे’ पाणी प्रणाली बसविणे व त्याच्या देखभालीकरीता व्यवस्था करणे. 
- स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन करणे. उत्पन्न वाढीसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करणे. पेव्हर ब्लाॅक बसविणे, डास मुक्त गावासाठी प्रयत्न करणे. 
- ग्रामपंचायत भवन नसेल अशा ठिकाणी भवन बांधणे किंवा भवनाचा विस्तार करणे. फर्निचर खरेदी करणे. अंगणवाडीसाठी इमारत बांधणे. 
- सार्वजनिक रस्त्यावर दिवे लावण्याची व्यवस्था करणे व दिव्यांची देखभाल दुरूस्ती करणे.

Web Title: fund for village development