सुकलेल्या झाडांची नगरपालिकेवर प्रेतयात्रा

shegav
shegav

शेगाव (बुलडाणा) : शेगाव नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. तर या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची झोप उघडविण्यासाठी आज शिवसेनेच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा नगर पालिकेवर पोहचवून आंदोलन केले. या आंदोलनामुळे हडबडुन गेलेल्या न.प. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांविरोधात काम बंद आंदोलन पुकारुन कर्मचार्‍यांनी पोलीसात कार्यवाहीसाठी निवेदन दिले. 

शेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शहरातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शहर विकास करीत असताना या झाडांच्या मोबदल्यात हजारो झाडे शहराच्या हद्दीत लावण्यात आली. अनेक भागांमध्ये नगर पालिका व शहरातील दानशुर संस्थांच्या वतीने ट्री- गार्ड ही लावण्यात आले. मात्र भर उन्हाळयामध्ये या झाडांना पाणी नसल्याने शहरातील शेकडो झाडे पूर्णपणे सुकली आहेत. तर हजाराच्या वर झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे.

या झाडांना नगर पालिकेने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावर मुख्याधिकार्‍यांनी टँकरव्दारे लगेच पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र आश्वासनाची पुर्ती झाली नसल्याने आणि झाडे मृत पावण्याच्या संख्येत वाढ होत चालल्याने आज गुरुवारी शिवसेनेच्या नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष दिनेश शिंदे, शैलैष डाबेराव, योगेश पल्हाडे, काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेष पटोकार यांच्यासह राजाभाऊ शेगोकार, गोपाल पांडे, आशिष गणगणे आदींनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक येथुन सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा काढुन न.प.मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या थेट कॅबिन समोर धडकवली.

यावेळी पोलीसांनी अडविल्याने ही तिरडी यात्रा कॅबिनच्या आत पोहचविता आली नाही. दरम्यान आंदोलकांनी न.प.च्या इमारतीमध्ये तिरडी ठेवून ठाण मांडले. यावेळी बर्‍याच वाटाघाटीनंतर मुख्याधिकारी पंत यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले. यावेळी येत्या दोन दिवसात झाडांना पाण्याचे टँकर सुरु झाले नाही तर यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडु व याला फक्त न.प. प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलक नगरसेवकांनी दिला.

दरम्यान आंदोलकांनी तिरडी यात्रा ही वाजत गाजत न.प.च्या इमारतीमध्ये पोहचविली म्हणुन आपल्यावर दबाव निर्माण झाला. असा मुद्दा समोर करीत न.प.कर्मचार्‍यांनी काही काळ कामबंद आंदोलन पुकारुन सर्वच कर्मचार्‍यांनी शहर पोलीस स्टेशन गाठुन आंदोलकांवर कारवाई व्हावी यासाठी ठाणेदार डी.डी.ढाकणे यांना निवेदन सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com