Gadchiroli–Chimur Lok Sabha Election Results: वाढीव मतदान ठरलं निर्णायक! काँग्रेसच्या नवख्या नामदेव किरसान यांनी केला अशोक नेतेंचा पराभव

Gadchiroli–Chimur Constituency Result 2024 Congress Namdeo Kirsan Won : महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपकडून तिसऱ्यांदा अशोक नेते त्यांना उमेदवारी देण्यात आली. तर, काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना मैदानात उतरवलं.
Gadchiroli–Chimur Lok Sabha Election Results: वाढीव मतदान ठरलं निर्णायक! काँग्रेसच्या नवख्या नामदेव किरसान यांनी केला अशोक नेतेंचा पराभव

गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघ हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपकडून तिसऱ्यांदा अशोक नेते त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसने डॉ. नामदेव किरसान यांना मैदानात उतरवलं. त्यांनी नेतेंचा जवळपास १ लाख ४० हजार मतांनी पराभव केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी यांनी देखील मतदारसंघामध्ये वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. पण, खरी लढत नेते विरुद्ध किरसान अशीच झाली.

उमेदवाराचे नाव ---------मिळालेली मतं------- मताधिक्य

१. डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस) - ६१७७९२ ---- १४१६९६

२. अशोक नेते (भाजप) - ४७६०९६

३. हितेश मडावी (वंचित) - १५९२२

मतदारसंघामध्ये वाढीव मतदान

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग आहे. या मतदारसंघामध्ये १९ एप्रिलला मतदान झाले. मतदारसंघामध्ये विक्रमी ७१.६७ टक्के मतदान झाले. अहेरी, गडचिरोली, चिमूर, ब्रह्मपुरी, आरमोरी आणि आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश गडचिरोलीमध्ये होतो. २०१९ पेक्षा यावेळी जवळपास ७ टक्के मतदान जास्त झाले. त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं.

Ashok Nete vs Congress Namdeo Kirsan
Ashok Nete vs Congress Namdeo Kirsan
Gadchiroli–Chimur Lok Sabha Election Results: वाढीव मतदान ठरलं निर्णायक! काँग्रेसच्या नवख्या नामदेव किरसान यांनी केला अशोक नेतेंचा पराभव
Bhandara–Gondiya Lok Sabha Election Results: प्रशांत पडोळे देणारे सुनील मेंढेंना धोबीपछाड? दिग्गज नेत्यांनी लावला होता जोर

उमेदवारी मिळण्यास उशीर

अशोक नेते यांना उमेदवारी देण्यास भाजपने उशीर केला. त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चा मतदारसंघात जोरदार झाल्या. शिवाय सलग दोनवेळा खासदार राहिले असल्याने काही प्रमाणात त्यांच्याविरोधात मतदारसंघामध्ये वातावरण निर्माण झालं होतं. आतील माहितीनुसार, अहेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा अत्राम यांनी याठिकाणी आपल्या उमेदवाराला तिकीट मिळावे यासाठी जोर लावला होता. त्यामुळेच नेते यांना तिकीट मिळण्यास उशीर झाला.

Gadchiroli–Chimur 2019
Gadchiroli–Chimur 2019

सहा विधानसभा मतदारसंघापैकी आमगाव आणि ब्रम्हपुरीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, तर इतर ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. त्यात काँग्रेसने नामदेव किरसान या नव्या चेहऱ्याला संधी दिली. किरसान हे बाहेरचे असल्याचा मुद्दा भाजपकडून प्रचारात आणला गेला. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी किरसान यांना विजयी करण्यासाठी जोर लावला होता. अशोक नेते यांच्यावरील मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा किरसान यांना फायदा होण्याची शक्यता होती.

Gadchiroli–Chimur
Gadchiroli–Chimur
Gadchiroli–Chimur Lok Sabha Election Results: वाढीव मतदान ठरलं निर्णायक! काँग्रेसच्या नवख्या नामदेव किरसान यांनी केला अशोक नेतेंचा पराभव
Chandrapur Lok Sabha 2024 Election Results: प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवारांना देणार धक्का? चंद्रपूर पुन्हा काँग्रेसकडेच राहणार?

महत्त्वाचे मुद्दे

- अशोक नेते यांच्याबाबत असलेली नाराजी

- जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प

- रस्ते कामाचे संथ काम

-वैद्यकीय महाविद्यालय

- उच्च शिक्षित नामदेव किरसान

-वडेट्टीवार यांनी लावलेला जोर

२०१९ मध्ये कसा होता निकाल?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक नेते यांचा ५,१७,७२२ मते मिळवून विजय झाला. त्यांना ४५.०५ टक्के मतं मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या नामदेव दल्लुजी उसंदी यांचा ७७,३३६ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये नेते यांना ५,३५,६१६ (५२.१८ टक्के) मतं मिळाली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उसंदी यांचाच २,३६, ६४० मतांनी पराभव केला होता. २००९ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसच्या कोवेस मारतोराव सिनूजी यांचा विजय झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com