Gadchiroli Loksabha Election : ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास मंगळवार (ता. १६) सुरूवात करण्यात आली. येथील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांना हेलिकाॅप्टरद्वारे एअर-लिफ्ट करून मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले.
Gadchiroli Loksabha Election
Gadchiroli Loksabha Electionsakqal

Gadchiroli News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास मंगळवार (ता. १६) सुरूवात करण्यात आली. येथील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांना हेलिकाॅप्टरद्वारे एअर-लिफ्ट करून मतदान केंद्रावर पोहचविण्यात आले.

गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६८ मतदान केंद्रांवरील ७२ निवडणूक पथकाच्या २९५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह मंगळवारी सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय.- १७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे.

Gadchiroli Loksabha Election
Vidarbha Weather Update : विदर्भात आजही गारपीट शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com