Gadchiroli Crime : सात महिन्यांच्या गर्भवतीवर लैंगिक अत्याचार

प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर दोघांनी लैंगिक केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला गावात उघडकीस आली.
Women Rape
Women Rapesakal

गडचिरोली - प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर दोघांनी लैंगिक केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी संजय तुलाराम कपूरडेरिया (वय ३८) आणि ताराचंद तुलाराम कपूरडेरिया (वय ३२) रा. धमदीटोला या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती आहे. प्रसुतिकरिता ती काही दिवसांपूर्वी माहेरी आलेली होती. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी पीडितेचे आई- वडील शेतीच्या कामाकरिता बाहेर गेले होते.

दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपी संजय आणि ताराचंद या दोघांनी पीडिता घरी एकटी असल्याची संधी साधून बळजबरी घरात प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दखल केली.

दरम्यान कुरखेडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असून विवाहित आहेत. पीडिता गर्भवती असल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com