Gadchiroli News : कालेश्वरम प्रकल्प केसीआर यांचे ‘एटीएम’मशीन; राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवार (ता. २) महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर असलेल्या मेडीगड्डा धरणाला आकस्मिक भेट दिली.
kaleshwaram project Rahul Gandhi
kaleshwaram project Rahul Gandhisakal

गडचिरोली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवार (ता. २) महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर असलेल्या मेडीगड्डा धरणाला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी या धरणावरून थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला असून कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प केसीआर आणि त्यांच्या कुटुंबियांचे खासगी ‘एटीएम’ मशीन झाल्याचे म्हटले. तसचे या प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

गुरुवारी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाला भेट दिली. यावेळी आंबटपल्ली गावात झालेल्या सभेत त्यांनी हे आरोप केले. २१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा धरणाच्या काही पिल्लर्सना तडे गेल्याने सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

तेलंगणा येथे सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा तेलंगणात चांगलाच तापला आहे. मेडीगड्डा धरण हे कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचाच भाग असल्याने या पूर्ण प्रकल्पावरच राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र सीमेवरील भूपालपल्ली जिल्ह्यातील आंबटपल्ली गावात सभा घेतली. सोबतच मेडीगड्डा धरणाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. या प्रकल्पातील धरणाचे निकृष्ट बांधकाम करून केसीआर यांनी कोट्यवधी लाटले, नागरिकांना मात्र, यामुळे कोणताही लाभ मिळालेला नाही. उलट महाराष्ट्रातील सिरोंचासारख्या तालुक्यांना नुकसानच होत आहे. हा प्रकल्प म्हणजे ‘केसीआर फॅमिली एटीएम’ असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

मोठा पोलिस बंदोबस्त...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मेडीगड्डा धरण परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही काँग्रेस कार्यकर्त्यांना त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

हा परिसर गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला लागून असल्याने या भागातदेखील राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त उत्सुकता होती. मेडीगड्डा धरणाच्या पाहणीच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याची सीमा स्पर्शून गेलेले राहुल गांधी यांनी जिल्ह्यात दौरा करावा, अशीही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com