esakal | मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बिबट्याने केले ठार
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बिबट्याने केले ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील लगाम गावानजीक येल्ला या गावातील एक व्यक्ती मासोळ्या पकडण्यासाठी (विहीरीतून बेडूक काढण्यासाठी) गेली असता बिबट्याने हल्ला करून ठार केले. मृताचे नाव मुत्ता रामा टेकुलवार (वय ५५), असे असून ही घटना शुक्रवार (ता. ३) सायंकाळी घडली.

मृत मुत्ता टेकुलवार हे मासोळ्या पकडण्यासाठी आवश्यक बेडूक जमा करण्यासाठी शेतातील विहिरीत उतरले होते. या विहिरीलगतच जंगल आहे. त्यामुळे ते विहिरीतून बाहेर येताच बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. ते रात्रभर घरी न परतल्याने पत्नीने सकाळी ग्रामस्थांसोबत या परिसरात शोध घेतला असता एक भयंकर दृश्य त्यांना घटनास्थळी दिसले. शेतात टेकुलवार यांचे डोके धडावेगळे झाले होते व बिबट्या त्यांच्या मृतदेहाला खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला. या घटनास्थळी वनविभाग व पोलिस कर्मचार्‍यांनी पोहोचत पंचनामा केला.

हेही वाचा: अहमदनगर : पोलिस असल्याचा बनाव करणारा जेरबंद

दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून मृतकांच्या कुटुंबियांना तूर्तास मदत व बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे वनअधिकाऱ्यांना निर्देश दिले. मुत्ता रामा टेकुलवार हे घरचे कमावते होते त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असून (सुरेश व महेश) बिबट्याच्या हल्ल्यात घरच्या कमावता इसमाचे जीव गेल्याने शासनस्तरावर मदतीसाठी पाठपुरावा करून सानुग्रह मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.

loading image
go to top