गडचिरोली : नक्षल्यांकडून मजुरांना मारहाण

रस्‍त्‍याच्‍या कामावरील सहा वाहनांची केली जाळपोळ
Gadchiroli Naxal
Gadchiroli Naxal

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाले आहेत. नक्षल्यांनी रस्ता कामावरील सहा वाहने व दोन मिक्सर मशीनची जाळपोळ करून तीन मजुरांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री घडली.

जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्राअंतर्गत विसामुंडी येथे येचली गावातील गणेश नागपूरकर या पेटी कॉन्ट्रॅक्टरकडून रस्ता व पुलाचे काम सुरू आहे. वाहने आणि मजूर रस्ते निर्मितीच्या कामावर होते. बुधवारी रात्री २० ते २५ च्या संख्येने आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी कामाच्या स्थळी जाऊन मजुरांना झोपेतून उठवून बेदम मारहाण केली. यात तीन मजूर जखमी झाले.

तसेच रस्ता कामावरील एक जेसीबी, एक पोकलेन, दोन ट्रॅक्टर व दोन दुचाकींसह दोन मिक्सर मशीनवर डिझेल टाकून पेटवून दिले. रस्त्याचे काम बंद करा, अशी धमकी देऊन नक्षली तिथून निघून गेले. या जाळपोळीत कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

जखमी मजुरांना त्यांच्या सहकाऱ्यांनी भामरागड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार केले. याप्रकरणी भामरागड पोलिसांनी अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात जाळपोळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या भागात नक्षल शोध अभियान अधिक तीव्र केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील इरपनार तसेच एटापल्ली तालुक्यात रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेने कंत्राटदार तसेच ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com