नक्षलग्रस्त भागातील युवकांना चालकाचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या नवव्या बटालियनतर्फे नक्षलग्रस्त दुर्गम भागांतील 30 युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.

गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या नवव्या बटालियनतर्फे नक्षलग्रस्त दुर्गम भागांतील 30 युवकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.
दुर्गम भागांत रोजगाराची समस्या गंभीर आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागते. बेरोजगार युवकांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सीआरपीएफ बटालियन नऊतर्फे नक्षलग्रस्त राजाराम, रेपनपल्ली, ताडगाव, बुर्गी, पेरमिली येथील 30 युवकांना 45 दिवसांचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सीआरपीएफने गडचिरोली येथे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. प्रशिक्षणार्थ्यांचा सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी द्वितीय कमान अधिकारी पी. एस. ढपोला यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वत:चा व्यवसाय स्थापन करून किंवा नोकरी करून प्रगती करावी. सीआरपीएफ देशातील जनतेची सुरक्षा करण्यासोबतच त्यांच्या उन्नतीसाठीही कार्य करीत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उप कमांडंट बी. सी. रॉय यांच्यासह सीआरपीएफ जवान उपस्थित होते.
सिव्हिक ऍक्‍शन योजनेंतर्गत सीआरपीएफने जिल्ह्यात महिला व युवतींसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण तसेच साहित्य वाटप केले आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने व्यावसायिक
प्रशिक्षणामुळे महिला व युवकांच्या हाताला काम मिळत आहे. सोबतच दुर्गम भागात श्रमदानातून रस्ते व पुल दुरुस्तीचीही कामे सीआरपीएफतर्फे केली जात आहेत.

Web Title: Gadchiroli news