Gadchiroli Police Force : गडचिरोलीच्या तब्बल २९ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर

पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताकदिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले
police
police sakal

गडचिरोली- पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताकदिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षीसुद्धा प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलातील २९ पोलिस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांमध्ये मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, (1" BAR TO PMG), पोलिस निरीक्षक संदीप पुंजा मंडलिक, (2nd BAR TO PMG), पोलिस निरीक्षक अमोल नानासाहेब फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल बाळासाहेब नामदे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील विश्वास बागल,

सहायक पोलिस निरीक्षक योगीराज रामदास जाधव, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव नामदेव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार लहू दांडेकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल विठ्ठल आव्हाड, सहायक फाैजदार देवाजी कोतूजी कोवासे, पोलिस हवालदार देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, पोलिस हवालदार राजेंद्र अंताराम मडावी, नांगसू पंजामी उसेंडी , सुभाष भजनराव पदा, रामा मैनू कोवाची, प्रदीप विनायक भसारकर, पोलिस अंमलदार दिनेश पांडुरंग गावडे, एकनाथ बारीकराव सिडाम, प्रकाश श्रीरंग नरोटे, शंकर दसरू पुंगाटी,

गणेश शंकर डोहे, सुधाकर मानू कोवाची, नंदेश्वर सोमा मडावी, भाऊजी रघू महावी, शिवाजी मोडू उसेंडी, गंगाधर केरबा कराड, महेश पोचम मादेशी, स्वप्नील केसरी पदा यांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक प्राप्त सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे.

या कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक बहाल करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व अंमदारांनी उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबाबत गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने त्यांचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com