Naxal Arrested : नक्षल उपकमांडर चैनुराम कोरसाला गडचिरोली पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्र सरकारने १६ लाख रुपये बक्षिस जाहीर केलेल्या जहाल नक्षल उपकमांडरच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिस दलाला आले यश.
Naxal deputy commander Chainuram Korsa arrested
Naxal deputy commander Chainuram Korsa arrestedsakal

गडचिरोली - अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला व महाराष्ट्र सरकारने १६ लाख रुपये बक्षिस जाहीर केलेल्या जहाल नक्षल उपकमांडरच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले आहे. चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा (वय ४८)रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल उपकमांडरचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार शनिवार (ता. १४) नक्षल उपकमांडर चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कांकेर (छत्तीसगड) सीमेलगत असलेल्या जारावंडी व पेंढरी या दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे जारावंडी पोलिस स्टेशन हद्दीतील जारावंडी ते सोहगाव जाणाऱ्या रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवत चैनुराम कोरसा याला अटक केली.२०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलिस माओवादी चकमकीसंदर्भात त्याच्यावर एटापल्ली येथे दाखल गुन्ह्यावरून अटक करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सरकारने चैनुराम कोरसावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान)अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

कोरसाचा दलममधील कार्यकाळ...

  • २६ जून २००० ला पर्लकोटा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २००२ पर्यंत कार्यरत.

  • २०००२ ला एसीएम पदावर पदोन्नती होऊन २००३ पर्यंत कार्यरत.

  • २००३ मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन २०१४ पर्यंत माड डिव्हीजनमध्ये कार्यरत.

  • २०१४ मध्ये डिव्हीसीएम पदावरून डिमोशन होऊन एसीएम पदावर सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये काम केले.

  • सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये कामानंतर २६ नोव्हेंबर २०१६ ला पुन्हा डीव्हीसीएम पदावर पदोन्नती झाली.

  • सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये उपकमांडर या पदावर आजपर्यंत काम केले.

कोरसाने केलेले गुन्हे....

* पोलिसांसोबत चकमकी एकूण - ७

  • २००९ मध्ये पुंगड (छत्तीसगड) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.

  • २००९ मध्ये बालेवाडा (छत्तीसगड) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.

  • २००९ मध्ये बाशिंग (छत्तीसगड) जंगल परिसरातील चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग.

  • २०१० मध्ये गरपा (छत्तीसगड) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.

  • २०११ मध्ये कोल्हार (छत्तीसगड) जंगल परिसरातील चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग.

  • मे २०२० मध्ये पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. यात गडचिरोली पोलिस दलाचे एक पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस अंमलदार शहिद झाले होते.

  • २०२३ मध्ये हिक्केर (महाराष्ट्र) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग.

खुन - १

  • २०१० मध्ये कोंगाल जि. नारायणपूर (छत्तीसगड) येथील एका निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com