Gadchiroli Police Build Help Center in 24 Hours
esakal
गडचिरोली, ता. २३ : माओवाद्यांचे कंबरडे मोडत असतानाच पोलिसांनी आपले अस्तित्व कायम ठेवण्याच्या उद्देशाने अतिदुर्गम भागांत पोलिस मदत केंद्रांची स्थापना करण्याच्या कामास वेग दिला आहे. भामरागड तालुक्यातील फुलनार या अतिदुर्गम गावात १०० सी–६० कमांडो, २१ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलिस जवान, ५०० विशेष पोलिस अधिकारी व खासगी कंत्राटदारांच्या मदतीने अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस मदत केंद्र उभारले.