

Students Death
esakal
गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील एका खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात, रात्रीच्या वेळी झोपेत असताना सहा विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. या भीषण घटनेनंतर उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर उर्वरित तिघींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.