

Surrendered Maoist Couple Begins a Peaceful New Chapter
Sakal
गडचिरोली : माओवादी चळवळीचा हिंसक व रक्तरंजीत मार्ग सोडून १ जानेवारी २०२५ रोजी अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी (डिव्हीसीएम राही दलम) व त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, डिके झोन डॉक्टर टिम) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शरणागती पत्करून शांतीपूर्ण नवजीवनाला प्रारंभ केला होता. त्यांच्या शांतीपूर्ण आयुष्यात आता निरागस पावलांनी सुखसमृद्धीचा प्रवेश झाला असून त्यांना शुक्रवार (ता. २१) पुत्ररत्न प्राप्त झाले. शरण आलेल्या माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी राबविण्यात येणाया विविध उपक्रमांची फलश्रुती म्हणून सन २०२५ या वर्षात आतापर्यंत एकूण १०१ माओवादी सदस्यांनी शरणागती पत्करली आहे. १ जानेवारी २०२५ रोजी वरिष्ठ डिकेएसझेडसीएम तारक्कासह या अन्य १० माओवादी सदस्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शरणागती पत्करली होती.