महाप्रसादासाठी लागणार एफडीएची परवानगी

File photo
File photo

नागपूर : गणेशोत्सवावर एकापाठोपाठ विघ्न येत असून आता महाप्रसाद करायचा असेल तर गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. महाप्रासादातून होणारी विषबाधा टाळण्यासाठी मंडळांनी अन्न रक्षा कायद्याचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.
गणेशोत्सव भक्तीचा आणि उत्सहाचा उत्सव असला तरी आता रस्त्यांवर मंडप उभारणे, डीजे वाजविणे, जलप्रदूषण टाळण्यासाठी जलाशयांमध्ये विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात आता महाप्रासादाची भर पडली आहे. गणेशोत्सव दहा दिवसांवर आला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी जोमाने सुरू झाली आहे. मंडपासह इतर परवानगी घेण्यासाठीही मंडळांची धावपळ सुरू आहे. राज्य सरकार दरवर्षी गणेशोत्सव असो अथवा नवरात्रोत्सवातील महाप्रसादांची परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात येते. नागपूर शहरात त्याला अल्प प्रतिसाद मिळत असतो. नोंदणी करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ असून ऑनलाइनही नोंदणी करता येते. त्यासाठी फक्त मंडळाची नोंदणी असलेले प्रमाणपत्र आणि मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याच्या ओळखपत्राची गरज आहे. ही नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. उल्लघंन केल्यास कायदेशीर गुन्हा नोंदविण्याची तरतूद कायद्यात केलेली आहे, असे एफडीएचे सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे आणि शरद कोलते यांनी "सकाळ'ला सांगितले.
असा आहे नियम?
अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजवणे, अन्नाचे वाटप करणे अथवा अन्नाची विक्री करणे यासाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना बंधनकारक आहे. अगदी धार्मिक कार्यासाठी अन्न शिजवण्याकरिता किंवा कुठल्याही धार्मिक सणाच्या वेळेस महाप्रसाद तयार करण्यासाठी वा त्याचे वाटप करण्यासाठीदेखील "एफडीए'ची नोंदणी बंधनकारक आहे. अशी नोंदणी नसेल तर "एफडीए'ला कारवाई करण्याचा अधिकार आहे.
कशासाठी नियम?
विषबाधा होऊ नये आणि स्वच्छ सुरक्षित अन्न प्रसाद-महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जावा हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे दरवर्षी "एफडीए'कडून गणेशोत्सव मंडळांना नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.
मोजकी नोंदणी
कायद्याविषयी जनजागृती नसल्याने वा कायद्याबाबत उदासीनता असल्याने तुरळक मंडळच अशी नोंदणी करतात. त्यामुळे "एफडीए'कडून कायद्याबाबत जनजागृती करत कायद्याचे पालन करण्यासाठी मंडळांना आवाहन केले जाते. मात्र, संबंधित विभागाकडून जनजागृती करण्यात येत नसल्यानेच मंडळे पुढे येत नसल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com