दरोडेखोरांची टोळी जेरबंद

File photo
File photo

अमरावती : चांदूरबाजार येथील सुवर्णकाराचे दुकान फोडून 31 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या, टोळीतील तिघांना, अंबोली, ठाणे येथून स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली. शनिवारी (ता. 17) दरोडेखोरांना घेऊन पोलिस पथक अमरावतीत पोहोचले. या टोळीकडून सात लाखांचा ऐवज जप्त केला. शिवासिंग वीरसिंग दुधानी (वय 27, रा. अंबोली, ठाणे), करणसिंग छगनसिंग भोंड (वय 24 रा. गुरुगोविंदनगर, जालना) व मुख्तारसिंग जोगनसिंग टांक (वय 32 रा. वडाळी, अमरावती) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
चांदूरबाजार येथील जयस्तंभ चौकात धनंजय गोविंदराव सापधारे (वय 45) यांचे भवानी ज्वेलर्स फोडून 31 लाख 8 हजारांचा ऐवज लुटला होता. त्यात 600 ग्रॅम सोने, दहा किलो चांदी व दहा लाखांच्या रोकडचा समावेश होता. शिवासिंग हा दरोडेखोरांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवा व करणसिंग या दोघांविरुद्ध मुंबई, कल्याण, ठाणे येथे चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर तिघांनाही चांदूरबाजार पोलिसांच्या स्वाधीन केले. या टोळीत सहभागी तिघे जण अद्याप पसार आहेत.
चांदुरात येण्यापूर्वी फोडली तीन दुकाने
या दरोडेखोरांच्या टोळीने चांदूरबाजारातील ज्वेलरी दुकान फोडण्यापूर्वी, कारंजा घाडगे, कोंढाळी, अमरावती जिल्ह्यातील आसेगावपूर्णा येथील तीन दुकाने फोडल्याची कबुली दिली. त्यापैकी आसेगावात त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
गुन्ह्यात वापरली चोरीची कार
या टोळीने ठाणे येथील मुरबाळ ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली, तेथे चोरीचा गुन्हाही दाखल आहे. तीच कार त्यांनी इतर गुन्हा करताना वापरल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com