esakal | पोळ्याच्या करीला या गावात सशस्त्र चकमक! वाचा नेमके काय झाले
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वादाचे परीवर्तन हाणामारीत झाले. लाकडी फळीसह दगड, काठ्यांनी वार करून गुणवंत व सुधीर खंडारे यांना जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विरुद्ध बाजूने नीलेश बोरकर यांनी तक्रार दिली.

पोळ्याच्या करीला या गावात सशस्त्र चकमक! वाचा नेमके काय झाले

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : पोळा व करिच्या दिवशी शहरात व आसपासच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, गावठीसह विदेशी दारूची अवैध विक्री झाली. एका गटाने दुसऱ्या गटाची दारुविक्रीची माहिती पोलिसांना देऊन कारवाई करण्यास भाग पाडल्याच्या संशयावरीन दोन गटात सशस्त्र चकमक उडाली. त्यात चौघे जखमी झाले.

फ्रेजरपुरा हद्दीतील मासोद गावात ही घटना घडली. परस्परविरुद्ध तक्रारीवरून पोलिसांनी एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

गुणवंत आनंद खंडारे, सुधीर खंडारे, नीलेश दिनेश बोरकर व त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्य या घटनेत जखमी झाले. गुणवंत खंडारे हे घरासमोरच्या गाडगेबाबा मंदिराजवळ उभे असताना त्या ठिकाणी उमेश प्रल्हाद बोरकर, दिनेश बोरकर, रोहन बोरकर, प्रतीक बोरकरसह अन्य काही लोक जमा झाले. त्यांच्यात वाद झाला.
असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले
वादाचे परीवर्तन हाणामारीत झाले. लाकडी फळीसह दगड, काठ्यांनी वार करून गुणवंत व सुधीर खंडारे यांना जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विरुद्ध बाजूने नीलेश बोरकर यांनी तक्रार दिली. नीलेश याच्या काकासोबत काही लोक वाद घालून मारहाण करीत होते. तेथे मध्यस्थीसाठी गेलेल्या निलेशसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना गुणवंत खंडारे, बाळासाहेब खंडारे, सुधीर खंडारे, छोटू खंडारे (सर्व, रा. मासोद) आदींनी लोखंडी अँगलसह काठीने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top