मार्चपर्यंत गंगेचे पाणी स्वच्छ ः नितीन गडकरी

तिरोडा ः दीपप्रज्वलन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस.
तिरोडा ः दीपप्रज्वलन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस.

तिरोडा (जि. गोंदिया) ः येत्या मार्चपर्यंत गंगेचे पाणी पूर्णतः स्वच्छ होईल. 26 हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत. रस्ते निर्माण होताना त्यासाठी लागणारी माती, मुरूम हे मामा तलाव, शेततळे, नाला, नदी, खोलीकरण, रुंदीकरण यातून घेतल्यास पाणी साठवण जास्त होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
तिरोडा-गोरेगाव क्षेत्रातील सिंचन क्रांतीचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा येथील जिल्हा परिषद कन्या विद्यालयातील पटांगणात शनिवारी (ता. 23) पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, गोरेगावचे नगराध्यक्ष आशीष बारेवार, तिरोडा नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, मुख्याधिकारी विजय देशमुख, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, बाळू मळघाटे उपस्थित होते.
धावत्या पाण्याला चालायला लावले पाहिजे, चालणाऱ्याला थांबायला लावले पाहिजे व थांबलेल्या पाण्याला जमिनीने प्यायला पाहिजे. त्यामुळे पाण्याची अंतर्गत पातळी वाढेल याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारने साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती दिली. धापेवाडा उपसासिंचन योजनेकरिता लागणाऱ्या 200 कोटींच्या निधीपैकी मी आताच 100 कोटी व ते खर्च होण्यापूर्वी 100 कोटी रुपये देतो, त्यामुळे ही योजना अल्पावधीत पूर्ण होईल, याच योजनेचा तिसरा टप्पासुद्धा आहे. यातून 91 हजार हेक्‍टर जमीन सिंचित होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कॅनलऐवजी पाइपलाइनचा वापर होत असल्याने पाण्याचा अपव्यव होत नाही. महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्‍न सुटला तर, 75 टक्‍के प्रश्‍न सुटतील. प्रधानमंत्री सिंचन 26 प्रकल्प मंजूर करून 25 टक्‍के व 75 टक्‍के नाबार्डचे कर्ज यातून पूर्ण होणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रास्ताविक आमदार विजय रहांगडाले यांनी, तर संचालन मदन पटले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com