नगरसेविका गार्गी चोप्रा यांचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

नागपूर - कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गार्गी प्रशांत चोप्रा यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे कॉंग्रेसला चांगलाच धक्का बसला. पक्षांतर्गत मतभेदांना कटांळून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे त्यांचे अद्याप पदग्रहणसुद्धा केलेले नाही. 

नागपूर - कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गार्गी प्रशांत चोप्रा यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे कॉंग्रेसला चांगलाच धक्का बसला. पक्षांतर्गत मतभेदांना कटांळून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे त्यांचे अद्याप पदग्रहणसुद्धा केलेले नाही. 

गार्गी चोपरा या प्रभाग क्रमांक 10 मधून सुमारे चार हजार मतांच्या फरकाने निवडून आल्यात. या प्रभागात चारही कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत; मात्र मतांची आघाडीच चोप्रा यांच्या राजीनाम्यास कारण ठरल्याचे बोलले जात आहे. डॉ. चोप्रा यांनी 10 हजार 981 मते घेऊन भाजपच्या चंदा ठाकूर यांना पराभूत केले. ठाकूर यांना सहा हजार 495 मते पडली. येथील कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना नऊ हजार मते पडली. ग्वालवंशी आणि प्रतिस्पर्धी रमेश चोपडे यांच्यात शेवटपर्यंत चुरशीचा सामना रंगला होता. फक्त 64 मतांनी ग्वालवंशी निवडून आले. यावरून कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्ये आपसात मतभेद निर्माण झाले. चोप्रा यांनी फक्त स्वतःच्याच विजयाकडे लक्ष दिले. सर्व उमेदवारांना सोबत घेऊन प्रचार केला नाही. यामुळे ग्वालवंशी आणि चोप्रा यांच्यात काही दिवसांपूर्वी चांगलेच खटकल्याचे समजते. महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. फक्त 29 नगरसेवक निवडून आले आहेत. यात गार्गी चोप्रा यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या अठ्ठावीसवर आली आहे. गटबाजी आणि पाडापाडीमुळे कॉंग्रेसच्या झालेल्या पराभवाची चौकशी करण्यासाठी उद्या शनिवारी माजी मंत्री नसीम खान नागपूरला येत आहेत. चोप्रा यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसच्या अडचणीत आणखीत आणखी भर पडणार आहे. चोप्रा यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्त, नवनिर्वाचित महापौर, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. 

राजीनाम्याचे वैयक्तिक कारण 
यासंदर्भात डॉ. प्रशांत चोप्रा यांच्याशी संपर्क साधला त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिल्याचे सांगितले. आपली कोणाविषयी तक्रार नाही. नाराजीसुद्धा नाही. मात्र, जास्त मते घेणे काहींना आवडले नसल्याचे सांगून त्यांना आपली नाराजीही लपविता आली नाही. 

Web Title: Gargi Chopra resigns