धामणगाव रेल्वेस्थानकावर `गरीबरथ`ला थांबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

वर्धा : नागपूरवरून पुण्याला जाणारी गरीबरथ एक्‍स्प्रेस धामणगाव येथे थांबावी, याकरिता अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीचा सतत पाठपुरावा करून शुक्रवारी आपल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले. शनिवार (ता.21) पासून 12113/12114 नागपूर-पुणे-नागपूर गरीबरथ एक्‍स्प्रेसचा धामणगाव रेल्वेस्थानकावर थांबा मंजूर झाल्याचा आदेश प्राप्त झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

धामणगाव हे वर्धा लोकसभा क्षेत्रातील एक प्रमुख बाजारपेठेचे शहर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वेसेवेने जोडणारे महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. धामणगाव येथे गरीबरथ एक्‍स्प्रेसला थांबा मिळाल्यास पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी व वास्तव्यास असलेल्या धामणगाव शहर व यवतमाळ येथील नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होईल, असा युक्तिवाद खासदार रामदास तडस यांनी वेळोवेळी रेल्वे समितीच्या बैठकीमध्ये तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केला होता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी धामणगाव येथील नागरिकांची मागणी पूर्ण केल्याबद्दल वर्धा लोकसभा क्षेत्राच्या वतीने खासदार तडस यांनी त्यांचे आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: `Garibarth` got stop at Dhammanga Railway Station