कोलुरा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नेर (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील कोलुरा येथे शेतकऱ्याच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही.
मधुकर सूर्यभान डोमाळे (वय 65) या शेतकऱ्याच्या राहत्या घरी सकाळचे चहापाणी झाल्यानंतर आठ वाजताच्या सुमारास सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने त्या खोलीत कुणी नसल्याने जिवितहानी झाली नाही. परंतु टि. व्ही.. कपडे, भांडी व तेथील संपूर्ण सामान जळून खाक झाले. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, आजूबाजूचे लोक गोळा झाले. डोमाळे यांनी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cylinder explosion at Kolura