आंतरिक सुरक्षा पदकाने गौतम धवने सन्मानित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

दिग्रस (जि. यवतमाळ) : भारतीय सैन्य दलात असलेले गौतम धवने यांना भारत सरकारतर्फे आंतरिक सुरक्षा पदकाने शनिवारी (ता.27) सन्मानित करण्यात आले. प्रेसिडेंट पुलिस मेडल फॉर गैलंट्रीकरिता त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

दिग्रस तालुक्‍यातील लायगव्हान (मांडवा) येथील रहिवासी गौतम धवने 2011 मध्ये सैन्यदलात रुजू झाले. तीन महिने कोब्रा कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण करून कोब्रा कमांडोमध्ये निवड झाली. जिवाची पर्वा न करता जंगलामध्ये नक्षल अभियानात 40 किलो वजन पाठीवर घेऊन देशाचे रक्षण करीत आहेत. त्यांनी 40 नक्षलवाद्यांचा कमांडर असलेल्या चंदन माझी या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले. त्यांच्या या विशेष कामगिरीबद्दल झारखंडचे पोलिस महानिरीक्षक राजकुमार मलीक यांच्याकडून प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्ली गृहमंत्रालयाचे डीजी राजुराय भटनागर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारत सरकारचा आंतरिक सुरक्षा पुरस्कार हा सन्मान शनिवारी (ता.27) दिल्ली येथे कोब्रा कमांडोचे कमांडंट के. ए. निंगम यांच्या हस्ते देण्यात आला. विशेष बाब म्हणजे देशातील दहा कोटी सैन्यांमधून दहा कोब्रा कमांडोंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautam Dhawan honored with Internal Security Medal