Gita Narote
sakal
गडचिरोली - एक काळ होता जेव्हा तिच्या हातात माणसांचे जीव घेणारी बंदूक होती. पण तथाकथित रक्तरंजित नक्षलवादी क्रांतीचा हिंसेचा मार्ग सोडून ती आता विद्येच्या वाटेवर मार्गस्थ झाली आहे. शिक्षणात प्रगती करताना तिने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. ही प्रेरणादायी कथा आहे मूळच्या गडचिरोली जिल्ह्याच्या पण छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या गीता नरोटे या माजी नक्षलवादी कमांडर महिलेची.