आज मुंबईत घोडमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

हिंगणा : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे उद्या शनिवारी (ता.14) मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याची टीकाही घोडमारे यांनी केली.

शुक्रवारी हिंगणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटागंणावर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होऊन त्यांनी आपण भाजप सोडत असल्याची घोषणा केली. यावेळी माजी मंत्री रमेश बंग प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी घोडमारे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हॉटेल रेडिसन येथे भेट घेतली होती. घोडमारे म्हणाले, आमदार असताना गडकरी यांच्या सांगण्यावरून आपण समीर मेघे यांच्यासाठी जागा सोडली. पक्षाचा आदेश मानून मेघे यांचे प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांना निवडून आणले. आपणास विधान परिषदेची उमेदवारी देण्याचे आश्‍वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, तालुक्‍यात दुसरे नेतृत्व नको म्हणून मेघे यांनीच आपल्या नावाला विरोध दर्शवला. पाच वर्षे आपले व आपल्या समर्थकांचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच त्रासामुळे आपण भाजप सोडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghodmare will enter in rashtrvadi party