esakal | बोंबला! 'प्रेमविवाह न करण्याची शपथ' घेणारीच झाली प्रियकरासोबत फुरर...
sakal

बोलून बातमी शोधा

Girl from Amravati district fled with her boyfriend

मुलींचा आपल्या आई-वडिलांवर लग्न करून देणार नाही, असा विश्‍वास नाही का, असा प्रश्‍न विद्यार्थिनींना केला होता. त्यातून ही शपथ देण्यात आली होती. 

बोंबला! 'प्रेमविवाह न करण्याची शपथ' घेणारीच झाली प्रियकरासोबत फुरर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे... येथील महिला कला-वाणिज्य महाविद्यालय... महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेंभूर्णी येथे 13 फेब्रुवारीला पार पडले... शिबिरात विद्यार्थिनींना "प्रेमविवाह न करण्याची शपथ' देण्यात आली होती. यामुळे हे शिबिर चांगलेच चर्चेत होते. आता पुन्हा या शिबिराची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. कारण, शिबिरात "प्रेमविवाह न करण्याची शपथ' घेणाऱ्या विद्यार्थिनीनेच प्रियकरासोबत पळ काढला. 

राष्ट्रीय योजना शिबिरात विद्यार्थिनींना "मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्‍वास आहे. समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही, मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही, सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते' अशी शपथ विद्यार्थिनींना देण्यात आली होती.

जाणून घ्या - बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना मिळाली धमकी

शिबिरात "युवकांपुढील आव्हाने' या विषयावर उद्‌बोधन सुरू असताना प्रा. प्रदीप दंदे यांनी युवकांपुढे अनेक आव्हाने असताना "मुलीवरील वाढते अत्याचार हेसुद्धा एक आवाहन आहे', असे सांगत एक घटना घडल्यावर दुसरी होणार नाही, असे वाटते. मात्र, लगेच प्रेमप्रकरणाच्या अनेक घटना घडताना दिसून येतात. मुलींचा आपल्या आई-वडिलांवर लग्न करून देणार नाही, असा विश्‍वास नाही का, असा प्रश्‍न विद्यार्थिनींना केला होता. त्यातून ही शपथ देण्यात आली होती. 

प्राचार्य, दोन प्राध्यापकांना केले निलंबित

13 फेब्रुवारीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याप्रकरणी संस्थेने प्राचार्य व दोन प्राध्यापकांना दोषी ठरविले होते. संस्थेची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता असंवैधानिक पद्धतीने विद्यार्थिनींना ही शपथ देण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी सांगितले होते. प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे, प्रा. डॉ. पी. पी. दंदे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे असे कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

क्लिक करा - मित्रांसह ती गेली ढाब्यावर, मात्र तिचीच पार्टी तिच्यासाठी ठरली शेवटची

शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार

"व्हॅलेंटाईन्स डे'च्या मुहूर्तावर प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीने अवघ्या दोन आठवड्यातच प्रियकरासोबत पळ काढला. प्रियकरासोबत पळालेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.