युवतीने दगड मारून केले युवकाला जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

अमरावती ः तब्बल चार वर्षे गोडीगुलाबीचे संबंध ठेवून नंतर टाळणाऱ्या युवकाला युवतीने दुचाकीवरून खाली पाडून त्याच्या गुप्तांगावर दगड मारून जखमी केले. ही घटना स्थानिक अर्जुननगर येथे सोमवारी (ता.22) सायंकाळी 6 वाजता घडली.

पीयूष (वय 21), असे जखमी युवकाचे नाव आहे. नंदा मार्केट परिसरातील खासगी दवाखान्याच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीयूष व संबंधित युवतीने शिक्षण सोबत घेतले आणि आता ते दोघेही एमएससी करीत आहेत. तब्बल चार वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित आहेत. मात्र एवढ्यात पीयूष तिला टाळत होता. पीयूष हा सोमवारी (ता.22) सायंकाळी दुचाकीवरून जात असताना युवतीने त्याचा दुचाकीने पाठलाग केला. अर्जुननगर येथे त्याला दुचाकीवरून खाली पाडले आणि त्याच्या गुप्तांगावर दगड मारला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याच्या निकटच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी युवतीविरुद्ध दगडाने जखमी केल्याचा गुन्हा नोंदविला. संबंधित मुलीची पीयूषच्या घरी ये-जासुद्धा होती, असे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl beat stone by a boy