हा प्रकार लक्षात येताच तिला प्रथम मुकुटबन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
झरी जामणी (जि. यवतमाळ) : विजेच्या धक्क्याने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील अडेगाव येथे शुक्रवारी (ता. २६) घडली. श्रुती किशोर थाटे असे मृत बालिकेचे नाव आहे.
श्रुती ही सहाव्या वर्गातील विद्यार्थिनी असून, सकाळी ती शिकवणीवर्गाला गेली होती. त्यानंतर ९ वाजता ती परत घरी आली. आईला मदत होईल म्हणून ती कपडे धुऊन सुकविण्यासाठी अंगणात असलेल्या तारांकडे गेली. कपडे तारेवर टाकताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला.
हा प्रकार लक्षात येताच तिला प्रथम मुकुटबन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?
घटनेची अधिक माहिती घेतली असता श्रुतीच्या घरावरून विद्युत महामंडळाची विद्युत लाईन गेलेली आहे. ती लाईन काढण्याची मागणी केली होती. परंतु, ती काढण्यात आली नाही. त्यामुळे घरावरील टीन पत्र्याच्या अँगलला बांधून असलेल्या तारांमध्ये वीज प्रवाह आला. अंगणात असलेल्या तारांवर कपडे टाकताच श्रुतीला विजेचा धक्का बसला, असे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.