esakal | वारली चित्रकलेतून साकारले भिंतींवर रामायण; अमरावतीच्या तरुणीचा लॉकडाउनमध्ये अनोखा उपक्रम

बोलून बातमी शोधा

वारली चित्रकलेतून साकारले भिंतींवर रामायण; अमरावतीच्या तरुणीचा अनोखा उपक्रम
वारली चित्रकलेतून साकारले भिंतींवर रामायण; अमरावतीच्या तरुणीचा अनोखा उपक्रम
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः कोरोनाच्या (Coronavirus) काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झालेले असतानाही काही सकारात्मक (Positive Things) गोष्टी मनाला ताजेपणा देऊन जातात. अमरावतीच्या (Amravati) भाग्यश्री पटवर्धन यांनीसुद्धा असाच एक प्रयोग केला. त्यांनी संचारबंदी ( Curfew) तसेच लॉकडाउनचा (Corona Lockdown) सदूपयोग करीत घराच्या संरक्षणभिंतीवर वारली चित्रकलेच्या (Warli Paintings) माध्यमातून संपूर्ण रामायणच (Ramayana) चितारले. त्यासाठी त्यांना १५ दिवसांचा कालावधी लागला. (Girl from Amravati paints warli paintings on Ramayana on wall)

हेही वाचा: शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना

व्यवसायाने ट्रॅव्हल फोटोग्राफर असलेल्या भाग्यश्री पटवर्धन यांनी कोरोना, तसेच लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद असल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हल फोटोग्राफर तसेच कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या भाग्यश्री यांनी काहीतरी सकारात्मक करण्याच्या उद्देशाने घराच्या संरक्षणभिंतीवर रामायण साकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी संरक्षणभिंतीवर रंगरंगोटी केली. त्यानंतर दररोज सकाळच्या वेळी दोन ते अडीच तास वारली चित्रकलेच्या माध्यमातून रामायण साकारण्यास सुरुवात केली.

रामजन्मापासून ते रावणवधापर्यंतचे सर्व क्षण त्यांनी आपल्या चित्रकलेतून अचूकपणे रेखाटले. रामजन्म, सीता स्वयंवर, वनवास, सीता हरण, लक्ष्मणरेषा, जटायूचे रावणासोबतचे युद्ध, हनुमान भेट, कुंभकर्ण युद्ध, इंद्रजित व मेघनाथ यांच्यातील युद्ध, संजीवनी पर्वत, रामसेतू, राम-रावण युद्ध तसेच रावण वधापर्यंतचे सर्व क्षण त्यांनी साकारले. विशेष म्हणजे केवळ रामायणच नव्हे तर चैत्रांगणाच्या रांगोळीमधील ५१ प्रकारची शुभचिन्हे त्यांनी साकारली आहेत. यासोबतच ब्रह्मकमळ, विष्णू दशावतारसुद्धा त्यांनी साकारले.

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

कोरोनाच्या या नकारात्मकेच्या वातावरणात सकारात्मकता निर्माण व्हावी, या उद्देशाने मी रामायणाचा आधार घेतला. दया, प्रेम, संयम, भक्ती या गोष्टी आपल्याला रामायणातूनच शिकायला मिळतात. आजकालच्या कठीण काळात मन शांत ठेवायला कलेमुळे सोपे झाले आहे.
- भाग्यश्री पटवर्धन, अमरावती.

(Girl from Amravati paints warli paintings on Ramayana on wall)