अनेकदा जेलमध्ये गेलो, आपले कुणी काही बिघडवत नाही असं म्हणत भररस्त्यात पकडला युवतीचा हात, पुढे...

संतोष ताकपिरे 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शहरातील युवती काही कामानिमित्त मैत्रिणीकडे गेली होती. तेथून घराकडे परत जात असताना रतन वसंत उके (वय ४५, रा. राजमातानगर) याने तिचा पाठलाग करून अडविले. रस्त्यावरच तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी मंदिराजवळ बसलेल्या दोघांना हाक मारली. ते दोघे पीडितेच्या मदतीसाठी आले. 

अमरावती : रस्त्यात अचानक तो तिच्यापुढे आला, काहीही विचार न करता भररस्त्यात तिचा हात पकडला, दोघे तिच्या मदतीसाठी धावून आले, पण त्याने त्यांनाही जुमानले नाही. अनेकदा जेलमध्ये जाऊन आल्याने आपले कुणी काही बिघडवत नाही, अशी धमकीही त्याने समजूत काढणाऱ्यांना दिली. 

शहरातील युवती काही कामानिमित्त मैत्रिणीकडे गेली होती. तेथून घराकडे परत जात असताना रतन वसंत उके (वय ४५, रा. राजमातानगर) याने तिचा पाठलाग करून अडविले. रस्त्यावरच तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी मंदिराजवळ बसलेल्या दोघांना हाक मारली. ते दोघे पीडितेच्या मदतीसाठी आले.

हेही वाचा - शादी डॉट कॉमवर दोघांचे प्रोफाईल मॅच झाले. मने जुळली, लग्नही झाले. मग उघड झाले हे सत्य...

त्यांनी रतनची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ झाली. स्वत:ची सुटका करून घेतल्यावर युवतीने घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. पालकांनी युवतीला शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविण्यास पाठविले. रतन उकेविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कोतवाली पोलिसांनी अटक केली. 

जावऱ्यातही महिलेची छेडखानी

वलगाव ठाण्याच्या हद्दीत जावरा गाव संशयित आरोपी दिनेश जगन्नाथ वानखडे (वय ४०) हा एका महिलेचा काही दिवसांपासून पाठलाग करीत होता. रस्त्यात जात असताना दिनेशने तिचा पदर ओढून छेडखानी केली. विवाहितेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी वानखडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

अधिक माहितीसाठी - पालकमंत्र्यांनी असे घाणेरडे राजकारण करू नये, कोण म्हणाले असे...

वडगावात छेडखानीनंतर अपहरण

आयुक्तालयातील नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा नेहमीच पाठलाग करून परमेश्‍वर हंसराज नेवारे (वय २५) याने तिची छेडखानी केली. काही दिवसांपूर्वी मुलीला फूस लावून पळवून नेले, असा आरोप अपहृत मुलीच्या पालकांनी तक्रारीत केला. नांदगावपेठ पोलिसांनी परमेश्‍वरविरुद्ध अपहरण, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl hand was caught by man in Amravati