बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आरोपी हा बॅच संपल्यावर पीडित मुलीला थांबायला सांगत असे. त्यानंतर आरोपीने पीडितेसोबत अश्लिल चाळे करत तिच्याशी जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवले. गेल्या काही वर्षांपासून आरोपी पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता.

अकोला : ज्याच्या भरवशावर मुलीचे भवितव्य घडविण्यासाठी पालक पाठवित होते, त्याच बॅडमिंटन प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. हा धक्कादायक प्रकार सिव्हिल लाइन्स रोडवरील आयएमए हॉलमध्ये घडला आहे. राहुल सरकटे असे आरोपीचे नाव असून त्याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. 

प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आरोपी हा बॅच संपल्यावर पीडित मुलीला थांबायला सांगत असे. त्यानंतर आरोपीने पीडितेसोबत अश्लिल चाळे करत तिच्याशी जबरदस्ती करत लैंगिक संबंध ठेवले. गेल्या काही वर्षांपासून आरोपी पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र नेहमीच होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा त्रास असह्य झाल्याने पीडितेने आरोपीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतल्यावर अनेक खुलासे समोर आले. ८ व्या वर्गात शिकत असताना पीडिता बॅडमिंटनचा सराव करायला सुरुवात केली. त्यानंतर ऑफिसर क्लबमध्ये आरोपी राहुल सरकटेची पीडितेसोबत ओळख झाल्याचे तिच्या जबाबात नोंदविण्यात आले आहे. 

आरोपी सरकटे याने सिव्हिल लाईन्स येथील आयएमए हॉल येथे बॅडमिंटन हॉल प्रशिक्षण वर्ग चालविण्यासाठी घेतला. त्याच्याकडे २० प्रशिक्षणार्थींची बॅच होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये आरोपीने पीडितेसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला सतत धमकावत होता. आरोपीने पीडितेचे अश्लिल छायाचित्रही काढली होती. त्यावरूनच आरोपी तिला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. 

दरम्यान, पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी राहुल सरकटे याला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Web Title: girl harassment in Akola