नागपूर: दहावीच्या विद्यार्थिनीवर घरात घुसून बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

या प्रकरणी विद्यार्थिनीने धंतोली पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी जय शितलप्रसाद शाहू (वय 22, तकीया, धंतोली) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

नागपूर : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या भरदूपारी घरात घुसून वस्तीत राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी विद्यार्थिनीने धंतोली पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी जय शितलप्रसाद शाहू (वय 22, तकीया, धंतोली) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

पीडित मुलगी राणी (बदललेले नाव) ही यशवंत स्टेडियमजवळील परीसरात राहते. आई-वडील दोघेही मोलमजूरी करतात. ती नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीत शिकते. आरोपी जय शाहू हा गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या मागावर होता. दोघांमध्ये शेजारी असल्यामुळे ओळख होती. तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. मात्र, तिचा प्रेमास विरोध होता. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी जय मुलीच्या घरी आला. त्यावेळी ती घरी एकटीच होती. त्याने संधी साधून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार देत प्रतिकार केला. आरोपीने बळजबरीने तिच्यावर तोंड दाबून बलात्कार केला. कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि पळून गेला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. आईसह ती धंतोली पोलिस ठाण्यात पोहचली. आरोपी जयविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

Web Title: girl raped in Nagpur

टॅग्स