अमरावतीच्या तरुणीची गुजरातमधून सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

अमरावती - तीनही मुलीच झाल्याने अमरावतीचे माहेर असलेल्या एका विवाहितेला सासरच्यांनी गुजरातमध्ये घरात डांबून तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. अमरावती पोलिसांनी पीडित महिलेसह तिच्या मुलींची सुखरूप सुटका केली. येथील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीचा सायरा (बदललेले नाव) विवाह गुजरातमधील अडसर गावात राहणाऱ्या सुमार करीम सोबत 2007 रोजी झाला होता. लग्नानंतर तिचा छळ होत होता. त्यातच सायराला तीन मुली झाल्या, मुलगा न झाल्याने सासरच्या मंडळींनी तिला डांबून ठेवले होते. अखेर तिने संधी साधून माहेरी फोन केला आणि त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाच्या साह्याने ही कारवाई केली.
Web Title: girl release in gujrat police