पेपर देऊन परतताना तरुणीचा खून

dead
dead

खामगाव (बुलडाणा) : पेपर देऊन परत घरी येताना तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास येथील संजीवनी कॉलनी भागात उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

आश्विनी सुधीर निबोकार (वय 27, रा. सनी पॅलेस जवळ, खामगाव) असे तरुणीचे नाव आहे. आश्विनी येथील लक्ष्मी नारायण आयटीआयमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रावर पेपर देण्यासाठी आज सकाळी 9.30 वाजता गेली होती. पेपर सोडवून दुपारी घरी परत जात असतानाच तिचा संजीवनी कॉलोनी परिसरात निर्घृणपणे खून करण्यात आला.

अश्विनीचा डोळा फोडण्यात आला असून धारदार वस्तऱ्याने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना कळताच पोलिस दाखल झाले असून पेचकच, वस्तरा तसेच मारेकऱ्यांचा गॉगल, घडयाळ हे साहित्य जप्त केले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि वरीष्ठ पोलिस अधिकारी  घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com