विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार

Rape
Rape

नागपूर - अकरावीतील विद्यार्थिनीचे सीताबर्डीतून अपहरण करून बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सीताबर्डी पोलिसांनी मालविन जॉन (२४, रा. मानकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

१६ वर्षीय मुलगी ईशिता (बदललेले नाव) सीताबर्डीतील सिव्हिल लाइन्समधील नामांकित कॉलेजमध्ये शिकते. तिच्याच वस्तीत मालविय जॉन राहतो. तो मिहानमधील नामांकित कंपनीत सुपरवायझर आहे. सप्टेंबर २०१८ पासून जॉन व ईशिताची ओळख झाली. दोघांचीही तेव्हापासून मैत्री फुलली. जानेवारी २०१९ ला ईशिता कॉलेजला गेली होती. दुपारी दोनला जॉनही तेथे पोहोचला. त्याने ईशिताला कॉलेज बाहेर बोलावले. बळजबरीने दुचाकीवर बसवून धरमपेठमधील पडक्‍या झोपडीत नेले. तेथे चॉकलेटमधून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यानंतर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास आई-वडिलाला ठार मारण्याची धमकी दिली. १५ दिवसांनंतर पुन्हा जॉनने कॉलेजसमोरून ईशिताला बळजबरीने नेऊन बलात्कार केला.

चार महिन्यांची गर्भवती
ईशितावर जॉनने अनेकदा बलात्कार केला. ती चार महिन्यांची गर्भवती झाली. सतत उलट्या करीत असल्यामुळे आईच्या लक्षात आले. त्यानंतर तिने जॉनने केलेला प्रताप आईकडे कथन केला. अशाप्रकारे ही घटना उघडकीस आली. 

क्‍लिनिकमध्ये गर्भपाताचा प्रयत्न
जॉन तिला धरमपेठ परिसरातील रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्‍टरांकरवी गर्भपाताचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला नातेवाइकाकडे नेले असता तेथे दोघांना लग्नाचा सल्ला दिला गेला. घरी गेल्यावर तरुणीने घरच्यांना लग्नाबाबत सांगितले. संतप्त कुटुंबाने मुलीसह सीताबर्डी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करीत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com