मुलीची आत्महत्या लपविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर - मुलीची युवकांसोबत असलेली मैत्री खटकल्यामुळे मुलीने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीची आत्महत्या लपविण्यासाठी आईवडिलांनी आटापिटा केला. परंतु, बजाजनगर पोलिसांनी सत्यता पडताळून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या  प्रकरणात आईवडिलाची भूमिका संशयास्पद असून पोलिस तपास करीत आहेत. नेहा दिनेश शाहू (वय १८, रा. काचीपुरा झोपडपट्‌टी) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. 

बजाजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शाहू हे पत्नी, दोन मुले, मुलीसह  काचीपुऱ्यात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते लिंबूपाणीचा ठेला लावतात. त्यांचा  मोठा मुलगाही हातठेला लावतो तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. मुलगी नेहा ही दहावीपर्यंत शिकली. नापास झाल्याने पुढील शिक्षण सोडून दिले होते. नेहाचे काही युवकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे तिच्या वडिलाला मुलांशी मैत्री पसंत नव्हती. 

नेहाला वारंवार ते समजावून सांगत होते. मात्र, नेहा वडिलाचे ऐकत नव्हती. मंगळवारी दुपारी वडील जेवण करायला घरी आले. त्यावेळी नेहा कुणाशीतरी मोबाईलवर बोलत होती. वडिलाने जेवण वाढायला सांगितले. परंतु, नेहाचे त्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे वडिलाने तिला चांगलेच खडसावले. दुपारी चार वाजताच्या सुमारास ते हातठेल्यावर निघून गेले तर तासाभरात आईसुद्धा मुलाच्या हातठेल्यावर लाइट पोहोचवून देण्यास गेली होती. वडिलाने रागावल्याचा राग मनात असलेल्या नेहाने किचनमध्ये दोरीने  गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर नेहा गळफास घेतलेल्या स्थितीत  आढळून आली. तिने पतीला फोन करून माहिती दिली. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. 

डॉक्‍टरांच्या अहवालाने घटना स्पष्ट
नेहाचा मृतदेह घरी आणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत शाहू कुटुंबीय होते. नेहा भोवळ येऊन पडल्याने मरण पावल्याची त्यांनी अफवा पसरवली. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी डॉक्‍टरांचा अहवाल मागितला. गळफास घेतल्याचे स्पष्ट होताच पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद केली. आईवडील नेहाची आत्महत्या लपविण्याचा प्रयत्न का करीत होते? अशी चर्चा काचीपुऱ्यात आहे.

Web Title: girl suicide crime