अभ्यासाच्या तणावातून युवतीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर - अभ्यासाच्या तणावातून 20 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना गणेशपेठमध्ये उघडकीस आली. अश्‍विनी विष्णू बारमासे (रा. जुना हिस्लॉप कॉलेजमागे, गणेशपेठ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

अश्‍विनी बीएस्सीचे शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून ती तणावात होती. आईवडिलांनी विचारले असता तिने अभ्यास न झाल्याने तणावात असल्याचे सांगितले होते. येत्या परीक्षेत नापास होण्याची भीती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सोमवारी साडेअकरा वाजता तिचे आईवडील धंतोलीतील रुग्णालयात गेले होते. दुपारी ते परत आले तेव्हा त्यांना घराचे दार बंद दिसले. त्यांनी लगेच मागच्या दरवाजातून जाण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने त्यांनी दार तोडून प्रवेश केला असता अश्‍विनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

Web Title: Girl suicide due to study tension