esakal | व्वा क्या बात है! त्या पेट्रोलपंपावर सगळ्या मुलीच मुली
sakal

बोलून बातमी शोधा

Screenshot

सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे वारे वाहत असल्याने सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या असून मुलामुलींना केवळ त्यावर अवलंबून ठेवणे धोक्‍याचे आहे. त्यामुळे समाजाने मुलींना खासगी कंपनी, उद्योग, राजकारण, क्रीडा व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

व्वा क्या बात है! त्या पेट्रोलपंपावर सगळ्या मुलीच मुली

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : परतवाडा शहरातील बहिरम मार्गावरील शहीद पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी चक्क मुलींना संधी उपलब्ध करून दिली आहे. मुलींच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जाते. शहरी भागात मुली पंपावर काम करीत असल्याचे नवीन नसले तरी अचलपूर तालुक्‍यात मुलींना रोजगार उपलब्ध करून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देणारा हा पहिलाच पेट्रोलपंप ठरला आहे.

या पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्याचे काम तीन मुली करीत आहेत. यापैकी एका मुलीने आरोग्य सेविकेचे (जीएनएम) शिक्षण घेतले आहे. आज मुलींनी शिक्षणात मोठी प्रगती केली असली तरी त्यांना सरकारी नोकरीपुरते प्रोत्साहित केले जाते. मात्र काळ बदलला आहे, सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे वारे वाहत असल्याने सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्या असून मुलामुलींना केवळ त्यावर अवलंबून ठेवणे धोक्‍याचे आहे. त्यामुळे समाजाने मुलींना खासगी कंपनी, उद्योग, राजकारण, क्रीडा व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

अधिक माहितीसाठी - दररोज तुमचे रूप दाखवणारा आरसाच तुम्हाला करू शकतो कंगाल.. कसा ते वाचा

विविध क्षेत्रांत मुलींना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याच विचारातून परतवाडा शहरातील शहीद पेट्रोलपंप चालकाने हा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील प्रत्येकाने विचार केल्यास मुली सुद्धा मुलांपेक्षा काम करण्यात मागे नाही असे चित्र दिसून येईल. त्यासाठी विविध ठिकाणी मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

मुली मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत
आज बहुतेक पेट्रोलपंपावर सर्वाधिक मुलेच काम करताना दिसून येतात. मात्र मुली मुलांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे आजघडीला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर सुद्धा मुली काम करू शकतात, याच हेतूने येथे मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली. आज घडीला तिन्ही मुली व्यवस्थित पेट्रोलपंप सांभाळत आहेत.
नीलेश वाघाळे व्यवस्थापक, शहीद पेट्रोलपंप.

loading image
go to top