esakal | सोशल मीडियावरून देहविक्रीचा व्यापार

बोलून बातमी शोधा

Girls business through social media

संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचा वापर चक्क देहविक्री व्यापारासाठी केल्या जात आहे. काही ठराविक सोशल मीडियावर ठराविक वेळेत डिलींगचा ग्रुप तयार केल्या जाऊन हवी तशी डील केली जाते. विशेष म्हणजे काही वेळेनंतर या व्यव्हाराचे सर्व पुरावे नष्टही केले जातात. तेव्हा देहविक्री व्यापाऱ्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. 

सोशल मीडियावरून देहविक्रीचा व्यापार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाचा वापर चक्क देहविक्री व्यापारासाठी केल्या जात आहे. काही ठराविक सोशल मीडियावर ठराविक वेळेत डिलींगचा ग्रुप तयार केल्या जाऊन हवी तशी डील केली जाते. विशेष म्हणजे काही वेळेनंतर या व्यव्हाराचे सर्व पुरावे नष्टही केले जातात. तेव्हा देहविक्री व्यापाऱ्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. 


विश्‍वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरात देहविक्री व्यापाऱ्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणाता काही ठराविक परिसरात केल्या जातो. काही परिसरातील अशा कुंटणखान्यांवर पोलिसांनी छापेमारी करीत पीडितांची सुटका आणि आंबटशौकिनाना कारागृहाची हवाही खाऊ घातली आहे. मात्र, आता इंटरनेटच्या जगतात सर्वकाही डिजिटल होत असताना देहविक्री व्यापारच मागे राहील हे कश्‍यावरून. तेव्हा पैशाची लालसा असणाऱ्यांनी संवादासाठी वापरण्यात येणाऱ्या काही सोशल मीडिया ॲप्सचा या धंद्यासाठी वापर सुरू केला आहे. काही ठराविक वेळेतच हा ग्रुप ॲक्टीव्ह होतो तर डिलींगनंतर ग्रुप डिलीट करून जैसे थे परिस्थिती केली जाते.