मुलीनी दिला वडिलाच्या प्रेताला खांदा

सागर कापसे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुलींना अंत्यसंस्कार करता येत नाहीत असा पायंडा ग्रामीण भागात असल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता.

पातुर्डा फाटा (संग्रामपूर) - आयुष्यातील प्रत्येक वळणावर सुख दुःखात सहभागी होणाऱ्या महिलांना आजही ग्रामीण भागात अंत्यसंस्कार विधीला जाता येत नाही. मात्र खिरोडा येथील रामदास रामकृष्ण गायकवाड यांचे निधनानंतर त्यांना त्यांच्या तीन मुलींनी खांदा दिला आणि अंत्यसंस्कार केले.

संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथील सेवानिवृत्त कर्मचारी रामदास रामकृष्ण गायकवाड यांचे सोमवारी आजाराने वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुलगा नसून तीन विवाहित मुली आहेत. निधन झाल्याची वार्ता नातेवाईक व मुलींना कळविण्यात आली. नांदुरा, नागपुर येथील तीनही मुली आपल्या कुटुंबासह अंतविधीत खिरोडा पोहचल्या. मात्र मुलींना अंत्यसंस्कार करता येत नाहीत असा पायंडा ग्रामीण भागात असल्याने अंत्यसंस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता. खिरोडा येथे आल्यानंतर रामदास गायकवाड यांचा खांदा, अंगनी त्यांच्या मुली देतील असा प्रस्ताव त्याचे नागपुर येथील थोरले जावई अनंत भारसाकळे यांनी  ठेवला. त्याला सर्वानी होकार दिला. त्यांनतर वडिलांच्या प्रेताला वर्षा सोपान बुरुकले, पिंकी अनंत भारसाकळे, सोनु प्रविण काटोलकार या 3 मुलीसह चुलत भाऊ शिवहरी पांडुरंग गायकवाड यांनी खांदा देवून अंत्यसंस्कार केले. खिरोडा येथे महिलांनी अंत्यसंस्कार केल्याची ही घटना असून समाजातील सकारात्मक बदल अधोरेखित करणारी आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The girls performed the last rites of their father in Sangrampur

टॅग्स